सेवेतील माणसाचा सन्मान!
ऊर्जा प्रकल्पातील “लाडके पेंटर मामा” विश्वनाथ कदम यांच्या हस्ते डेरीवरील माय ऊर्जा आउटलेटचे उद्घाटन
दौंड (प्रतिनिधी – विकास साळुंके)
शिरूर तालुक्यातील आंधळगाव परिसरात असलेल्या ऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीपासूनच आपल्या प्रामाणिक कामगिरीने प्रकल्पाचे सौंदर्य खुलवणारे लाडके पेंटर मामा विश्वनाथ कदम यांच्या कार्याचा गौरव करण्याचा अनोखा निर्णय डेरी व्यवस्थापन मंडळाने घेतला आहे. गुरुवार, दि. १६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता डेरीवरील “माय ऊर्जा आउटलेट” या नव्या उपक्रमाचे उद्घाटन विश्वनाथ कदम यांच्या शुभहस्ते होणार आहे.
२३ वर्षांच्या अखंड सेवेच्या काळात कदम यांनी ऊर्जा प्रकल्पातील प्रत्येक इमारतीला, भिंतीला आणि उपकरणांना आपल्या रंगकामाच्या कौशल्याने नवी ओळख दिली आहे. त्यांच्या हातातील ब्रशने केवळ रंगच नव्हे, तर प्रकल्पाच्या सौंदर्यातही नवा जीव ओतला आहे. त्यांच्या या कामामुळे डेरी परिसराचे सौंदर्य खुलले असून, कामगार वर्ग व अधिकाऱ्यांमध्येही त्यांचा सन्माननीय स्नेहसंबंध जपला गेला आहे.
प्रकल्पाच्या उभारणीपासून सातत्याने रंगरंगोटीचे कार्य, दुरुस्ती, देखभाल अशी अनेक जबाबदाऱ्या त्यांनी निष्ठेने पार पाडल्या आहेत. त्यांची प्रामाणिकता, मेहनत आणि कामाप्रतीची आवड यामुळेच डेरी व्यवस्थापन मंडळाने “माय ऊर्जा आउटलेट”चे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्याचा निर्णय घेतला — हा निर्णय म्हणजे त्यांच्या कार्याचा सन्मान आणि समाजातील प्रत्येक सेवेकराला प्रेरणा देणारा आदर्श ठरला आहे.
विश्वनाथ कदम यांच्या चेहऱ्यावर या निमित्ताने द्विगुणी आनंद दिसून आला. “मी फक्त माझं काम मनापासून केलं. पण डेरी परिवाराने माझ्या या छोट्या प्रयत्नाला इतकं मोठं स्थान दिलं, हे माझ्यासाठी आयुष्यातलं सर्वात मोठं पारितोषिक आहे,” असं भावनिक शब्दांत त्यांनी सांगस्थानिक नागरिक, डेरी कर्मचारी, अधिकारी, तसेच ग्रामस्थांच्या उपस्थितीत होणाऱ्या या उद्घाटन सोहळ्यात परिसरात उत्साहाचे वातावरण आहे.
“सेवेचा सन्मान – माणुसकीचा मान” हा संदेश या उपक्रमातून समाजात पोहोचत आहे.











