February 10, 2026 11:49 pm

दैनिक चालू वार्ताचा “उत्कृष्ट पत्रकारिता गौरव पुरस्कार”स्वरूप गिरमकर यांना जाहीर..!

दैनिक चालू वार्ताचा “उत्कृष्ट पत्रकारिता गौरव पुरस्कार”स्वरूप गिरमकर यांना जाहीर..!

हा सन्मान माझ्यासाठी नक्कीच प्रेरणा देणारा ठरेल, व मला जास्तीत जास्त गोरगरिब जनतेची कामे करण्यासाठी बळ देत राहील, दैनिक चालू वार्ता च्या वतीने माझा होत असलेला हा गुणगौरव हा माझ्यासाठी एक प्रेरणादायी क्षण असेल – स्वरूप गिरमकर

विजय कांबळे – प्रतिनीधी

नागरगाव – अल्पकालावधीतच असंख्य वाचकांच्या मनात ठसा उमटवणारे लोकप्रिय प्रसारमाध्यम म्हणजे दैनिक चालू वार्ता आणि या प्रसार माध्यमांची परिसरामध्ये महत्त्वपूर्ण ओळख करून देणारे स्वरूप तुकाराम गिरमकर प्रतिनिधी वाघोली जिल्हा पुणे हे सातत्याने समाजामध्ये तळागाळामधील असणाऱ्या गोरगरीब जनतेला आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून योग्य न्याय देण्याचे काम करत असतात तसेच सामाजिक,राजकीय धार्मिक, क्रीडा,शेती,उद्योग,व्यापार, पोलीस स्टेशन,प्रशासक या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी दैनिक चालू वार्ता या वृत्तपत्राची छाप आपल्या कार्यातून व कर्तुत्वातून पाडलेली आहे.त्यामुळे खऱ्या अर्थाने चालू वर्षीचा असणारा २०२४- २०२५ उत्कृष्ट पत्रकारितेचा गौरव पुरस्कार हा स्वरूप गिरमकर यांना देऊन चौथ्या वर्धपान दिनानिमित्त देऊन गौरविण्यात येणार आहे.
या पुरस्कारासाठी त्यांची निवड झाल्यामुळे त्यांना सर्वत्र शुभेच्छा दिल्या जात आहे तसेच त्यांचा हा सन्मान श्री डी. एस. लोखंडे पाटील मुख्य संपादक दैनिक चालू वार्ता संस्थापक अध्यक्ष स्वाभिमानी श्रमिक पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य, तसेच अनेक मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात येणार आहे. अशी माहिती त्यांनी दिलेली आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आव्हान त्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Advertisements

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें