February 9, 2026 5:23 pm

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 126 वा पदवी प्रदान समारंभ

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 126 वा पदवी प्रदान समारंभ

मांडवगण फराटा येथील कन्या निलम वराळे सुवर्णपदकाने सन्मानित

प्रतिनिधी- मांडवगण फराटा- बालाजी कांबळे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 126 वा पदवी प्रदान समारंभ दिनांक 29 सप्टेंबर रोजी विद्यापीठाच्या परिसरात मोठ्या उत्साहात पार पडला. या समारंभात श्री वाघेश्वर विद्यालय मांडवगण फराटा येथील माजी विद्यार्थिनी, तसेच बारामती येथील शारदाबाई पवार महिला कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी निलम दिलीप वराळे (जगताप) हिने एम.एस्सी. बॉटनी (वनस्पतीशास्त्र) या विषयात संपूर्ण विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदकाचा मान मिळवला.

हा सन्मान महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, राष्ट्रीय मूल्यांकन व मानांकन परिषदेचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे व विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.

निलम वराळे हिने 2023 साली झालेल्या एम.एस्सी. बॉटनीच्या उच्च पदवी परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवून विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. तिच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, प्राचार्य व विभाग प्रमुख यांनी अभिनंदन करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

गावपातळीवर देखील या यशाचे कौतुक झाले. मांडवगण फराटा प्रशालेचे प्राचार्य श्री. चव्हाण सर, सर्व शिक्षक, गावचे सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांनी निलम वराळे हिचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

निलम वराळे हिचे यश हे बारामती शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक परंपरेला अधोरेखित करणारे असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Advertisements

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें