शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय, केडगाव येथे देवी शक्ती पीठ प्रदर्शनी
दौंड, ता. ३० :
शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय, केडगाव (ता. दौंड, जि. पुणे) येथे देवी शक्ती पीठांच्या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या विविध रूपांचे दर्शन घडविण्यात आले.
शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय, केडगाव येथे देवी शक्ती पीठ प्रदर्शनी प्रदर्शनीचे उत्तम नियोजन सेंटरच्या संचालिका सुनिता दीदी यांनी केले होते. धार्मिक वातावरणात झालेल्या या मंगलमय प्रसंगी देवीची पूजा, आराधना, आरती तसेच योगसाधना यांचे आयोजन करण्यात आले.
प्रवचनाच्या दरम्यान सुनिता दीदींनी परमपिता परमात्मा व देवी शक्तींचा महिमा याबाबत मार्गदर्शन केले. त्यांच्या विचारांनी उपस्थित महिला-भगिनी व बंधू मंत्रमुग्ध झाले. प्रवचनानंतर सर्वांना विश्वविद्यालयाच्या वतीने फराळाचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण “चैतन्य देवीचा देखावा” ठरला. या देखाव्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने उजळून निघाला होता. यावेळी परिसरातील अनेक महिला, भगिनी व बंधूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या धार्मिक उपक्रमासाठी सर्व कुटुंबिय व कार्यकर्त्यांचा उत्तम सहयोग लाभला. परिसरात या नवरात्र उत्सव व देवी शक्ती पीठ प्रदर्शनीबाबत सर्वत्र कौतुक होत आहे.
आर. जे. न्यूज २७ मराठी साठी दौंड तालुका प्रतिनिधी – विकास साळुंके











