February 9, 2026 5:20 pm

ताशा किंग” सिराजभाई मनियार यांना आयडॉल ऑफ महाराष्ट्र पुरस्काराने गौरव*

*“ताशा किंग” सिराजभाई मनियार यांना आयडॉल ऑफ महाराष्ट्र पुरस्काराने गौरव*

*पुण्यातील दिमाखदार सोहळ्यात राज्यभरातून वाहतंय कौतुक!*

विजय कांबळे प्रतिनीधी

नागरगाव – दि. १५ सप्टेंबर २०२५
महात्मा फुले सांस्कृतिक भवन, पुणे येथे “द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य” आयोजित आयडॉल ऑफ महाराष्ट्र पुरस्कार सोहळा २०२५ मोठ्या जल्लोषात पार पडला. या दिमाखदार सोहळ्यातl महाराष्ट्रभरात आपल्या ताशा वादनाने तरुणाईला वेड लावणारे, सोशल मीडियावर लाखोंची फॅन फॉलोविंग असलेले सुप्रसिद्ध वादक “ताशा किंग” सिराजभाई मनियार यांना उत्कृष्ट ताशा वादक पुरस्काराने गौरविण्यात आले.

हा सन्मान भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती ताई देसाई आणि “द युवा ग्रामीण पत्रकार संघ” चे संस्थापक अध्यक्ष अन्सार शेख यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कार जाहीर होताच सभागृहात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले.

सिराजभाई मनियार हे गेल्या अनेक वर्षांपासून ताशा वादनाच्या क्षेत्रात नावीन्यपूर्ण शैली, जोशपूर्ण ठेका आणि कलात्मक सादरीकरण यामुळे ओळखले जातात. महाराष्ट्रातील सण-उत्सव, भव्य मिरवणुका आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्यांच्या ताशा वादनाने तरुणाईला अक्षरशः थिरकायला भाग पाडले आहे. इंस्टाग्राम, फेसबुक आणि युट्यूबवर त्यांचे व्हिडिओ लाखो व्ह्यूज मिळवत असून, देशभरात त्यांना “ताशा किंग” म्हणून एक वेगळी ओळख मिळाली आहे.

पुरस्कार स्वीकारताना भावुक होत सिराजभाई म्हणाले –
“हा सन्मान फक्त माझ्यासाठी नाही, तर प्रत्येक ताशा वादकासाठी आहे. ही कला टिकवून ठेवत पुढच्या पिढ्यांमध्ये जोमाने रुजवणे हेच माझे स्वप्न आहे.”

या सोहळ्याला उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी ठणाणा टाळ्यांनी दणाणून टाकले. त्यांच्या सन्मानामुळे महाराष्ट्रातील ताशा वादक आणि चाहत्यांमध्ये आनंद व अभिमानाची लाट उसळली आहे.

कार्यक्रमाला राज्य उपाध्यक्ष जीवन मोहिते, राज्य सचिव बाळासाहेब कोठुळे, राज्य महिला सचिव डॉ. मंगलताई सासवडे, राज्य खजिनदार इम्रान शेख,स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनेश होले, राज्य कार्याध्यक्ष स्वरूप गिरमकर, पुणे शहराध्यक्ष अनिल गवळी, जिल्हा उपाध्यक्ष काशिनाथ आल्हाट, मीडिया प्रमुख रोहित वाळके, जिल्हा खजिनदार इस्रार शेख, सामाजिक कार्यकर्त्या राणीताई जगताप, श्रीपती देशमाने पत्रकार महंमद मुलाणी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सिराजभाई मनियार यांचा हा सन्मान म्हणजे महाराष्ट्रातील पारंपरिक ढोल-ताशा संस्कृतीचा अभिमानच आहे. त्यांच्या गगनभेदी ठेक्यांनी आता पुरस्काराच्या रुपाने नवा इतिहास रचला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Advertisements

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें