–शिरूर कोर्ट आवारातून दुचाकी चोर

शिरूर (प्रतिनिधी) – शिरूर तालुक्यातील कोर्ट आवारातून दिवसाढवळ्या दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुहास रोहीदास मुखेकर (वय ४०, रा. ढाकीवस्ती, कवठे येमाई, ता. शिरूर) यांची काळ्या व लाल रंगाची हिरो कंपनीची एच.एफ. डिलक्स ही मोटारसायकल (क्र. MH-12 LE-8221) दि. १९ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १२.०० ते १२.३० या वेळेत अज्ञात चोरट्याने कोर्ट आवारातील पार्किंग मधून चोरून नेली.

दुचाकीची किंमत अंदाजे ३० हजार रुपये असून, मालकाने शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चोरी गेलेली मोटारसायकल मिळाल्यास ती ओळखता येईल, असे फिर्यादीने नमूद केले आहे.

या घटनेचा तपास पोलीस हवालदार राऊत हे करत असून, पुढील तपास शिरूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.











