February 9, 2026 5:13 pm

कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची 21 वी वार्षिक सर्वसाधारण सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात पार

कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची 21 वी वार्षिक सर्वसाधारण सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात पार

दौंड-कैडगाव (ता. 20 सप्टेंबर) – कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडच्या वतीने आयोजित 21 वी वार्षिक सर्वसाधारण सभा व भव्य शेतकरी मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी मार्केट यार्ड परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या डाळिंब मार्केट, कांदा मार्केट व तरकारी मार्केट शेडचे उद्घाटन आमदार राहुल कुल यांच्या हस्ते करण्यात आले.

यानंतर पार पडलेल्या मेळाव्यात तालुक्यातील प्रगतिशील शेतकऱ्यांना स्व. सुभाष अण्णा कुल कृषी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश अंकुश जगदाळे यांनी आपल्या कार्यकाळातील विकासकामांचा आढावा घेत शेतकरी बंधूंना माहिती दिली. डीपी डीसी फंडातून आमदार राहुल कुल यांच्या माध्यमातून तालुक्यात झालेल्या विविध कामांचा खर्चासह तपशील त्यांनी उपस्थितांसमोर मांडला.

यानंतर अध्यक्षीय भाषणात आमदार राहुल कुल म्हणाले की, “शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा मूळ केंद्रबिंदू असून त्याच्या मालाला व्यापाऱ्यांनी चांगला हमीभाव देणे आवश्यक आहे. दौंड तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.”

शेतकरी मेळाव्यात तालुक्यातील अनेक प्रगतशील शेतकऱ्यांना कृषी भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सर्जेराव जेधे, नामदेव बारवकर, तानाजी दिवेकर, गोरख दिवेकर, आप्पासाहेब हंडाळ, धनंजे शेळके, बापू शितोळे, महेश भागवत, हरिभाऊ ठोंबरे, आप्पासाहेब खळदकर आदी मान्यवर उपस्थित होते.

सर्व संचालक मंडळाच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला.

दौंड तालुका प्रतिनिधी – विकास साळुंके
आर जे न्यूज27 मराठी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Advertisements

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें