February 9, 2026 5:38 pm

उरळगाव परिसरात हातभट्टी दारूसह एक जण अटक

उरळगाव परिसरात हातभट्टी दारूसह एक जण अटक

शिरूर तालुक्यातील उरळगाव येथे बेकायदेशीर हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीस शिरूर पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 19 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास न्हावरे ते तळेगाव ढमढेरे रस्त्यालगत लजीज चायनीज दुकानाशेजारी इस्माईल रहीमान शेख (वय 54, रा. उरळगाव, ता. शिरूर, जि. पुणे) हा गावठी हातभट्टीची दारू विक्री करताना आढळून आला.

पोलिसांनी त्याच्या ताब्यातून 20 लिटर क्षमतेचा एक पांढऱ्या रंगाचा कॅन जप्त केला असून त्यामध्ये सुमारे 18 लिटर हातभट्टीची दारू मिळाली. या दारूची विक्री किंमत प्रति लिटर 100 रुपये प्रमाणे असून एकूण 1800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

या कारवाईत शिरूर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून प्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Advertisements

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें