February 9, 2026 5:53 pm

पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी सर्वसाधारण गटाचे आरक्षण जाही

पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी सर्वसाधारण गटाचे आरक्षण जाहीर

 

राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदांच्या आरक्षणाची प्रतिक्षा अखेर संपली असून ग्रामविकास विभागाने शुक्रवारी अधिकृत आदेश काढले. या आदेशानुसार पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी सर्वसाधारण गट घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये सर्वपक्षीय नेत्यांमध्ये मोठी चुरस निर्माण होणार आहे.

मागील निवडणुकीत हे पद सर्वसाधारण (महिला) गटासाठी राखीव होते. मात्र यावेळी सर्वसाधारण गटासाठी खुले झाल्याने विविध राजकीय गटातील नेत्यांना संधी उपलब्ध होणार आहे. परिणामी जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर या निर्णयाचा मोठा प्रभाव पडणार असल्याचे संकेत आहेत.

 आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये अनुसूचित जमाती, अनुसूचित जमाती (महिला), मागास प्रवर्ग, मागास प्रवर्ग (महिला), सर्वसाधारण व सर्वसाधारण (महिला) अशा विविध गटांचा समावेश आहे. त्यामुळे पंचायत समितीच्या स्तरावरही स्पर्धा रंगणार आहे.

राज्य सरकारच्या या घोषणेनंतर पुणे जिल्हा परिषद निवडणुकांच्या दिशेने मोठा टप्पा गाठला गेला असून, पुढील काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात चैतन्य निर्माण होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Advertisements

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें