February 9, 2026 4:43 pm

रांजणगाव एमआयडीसीत दोन मोबाईल चोरांना अटक; ८ मोबाईल जप्त किंमत तब्बल १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल हस्तग

रांजणगाव एमआयडीसीत दोन मोबाईल चोरांना अटक; ८ मोबाईल जप्त
किंमत तब्बल १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत


रांजणगाव एमआयडीसी (ता. शिरूर) परिसरातील मोबाईल चोरीच्या घटनांचा अखेर पर्दाफाश झाला असून पोलिसांनी दोन चोरट्यांना गजाआड करत तब्बल ८ मोबाईल फोन जप्त केले आहेत. या मोबाईलची एकूण किंमत सुमारे १ लाख ५ हजार रुपये इतकी आहे. या कारवाईमुळे परिसरातील कामगार व नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे.
चोरीची थरारक घटना
५ सप्टेंबर रोजी रात्री कोरेगाव येथील बांधकामस्थळी मजूर अर्जुन चौहान व त्यांचे काही सहकारी खोलीत झोपलेले असताना तीन चोरट्यांनी दबक्या पावलांनी आत प्रवेश केला. त्यांनी मजुरांचे चार मोबाईल (किंमत अंदाजे ४० हजार रुपये) चोरले. यावेळी कामगारांना जाग आली आणि त्यांनी आरडाओरडा केला. मात्र चोरटे मोबाईल घेऊन पसार झाले. घटनेनंतर तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली.
पोलिसांची झटपट कारवाई
तक्रार मिळताच रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी परिसरात सखोल शोधमोहीम राबवून दोन आरोपींना गजाआड केले. तपासादरम्यान त्यांच्या ताब्यातून सुरुवातीला ४ मोबाईल हस्तगत करण्यात आले. पुढील चौकशीत त्यांनी शिरूर व रांजणगाव परिसरातील आणखी चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी आणखी ४ मोबाईल (किंमत ६५ हजार रुपये) जप्त केले. अशा प्रकारे पोलिसांनी दोन चोरी व घरफोडी प्रकरणांची उकल केली.
पोलिसांचे सहकार्य
या कारवाईत पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई अविनाश थोरात, सहा. फौजदार दत्तात्रय शिंदे, पो.हवा. राजेश ढगे, नितीन भोस, पो.कॉ. गणेश वाघ, उमेश कुतवळ, योगेश गुंड, किशोर शिवणकर व संदिप भांड यांनी सक्रिय सहभाग घेतला. पुढील तपास सहा. फौजदार दत्तात्रय शिंदे आणि पो.हवा. अभिमान कोळेकर करत आहेत.
वरिष्ठांचे मार्गदर्शन
ही संपूर्ण कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिप गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Advertisements

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें