February 9, 2026 5:02 pm

गणेश विसर्जन व ईद-ए-मिलादनिमित्त शांतता समितीची बैठक दौंड पोलीस स्टेशनमध्ये संपन्न..

दौंड तालुका प्रतिनिधी- विकास साळुंके

गणेश विसर्जन व ईद-ए-मिलादनिमित्त शांतता समितीची बैठक दौंड पोलीस स्टेशनमध्ये संपन्न

दौंड : दौंड शहरात येत्या काही दिवसांत गणेश विसर्जन मिरवणुका व ईद-ए-मिलाद सण उत्साहात साजरे होणार आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात शांतता व सौहार्द टिकून राहावे, तसेच सर्व धार्मिक कार्यक्रम पार पडावेत यासाठी दौंड पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली.

या बैठकीत दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोपाल पवार, अप्पर पोलीस अधीक्षक (बारामती विभाग) गणेश बिराजदार, तसेच दौंड विभागीय अधीक्षक बापू दडस यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी व मुस्लिम समाज संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीत बोलताना अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार यांनी सांगितले की, “दौंड शहरातील सर्व उत्सव हे सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडावेत. गणेश विसर्जन मिरवणुका असोत वा ईद-ए-मिलादचे कार्यक्रम – प्रत्येक ठिकाणी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे ही सर्वांची जबाबदारी आहे. खेळीमेळीच्या वातावरणात उत्सव साजरे करावेत.” असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी पोलीस प्रशासनाने नागरिकांना शांतता व बंधुभाव जपत धार्मिक कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले.

आरजे न्यूज 27 – दौंड शहर प्रतिनिधी विकास साळुके 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Advertisements

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें