बाभुळसर बुद्रुक येथे धक्का वेब सिनेमाच्या शूटिंगचा शुभारंभ
शिरूर, ता. १ (प्रतिनिधी अल्लाउद्दीन अलवी) – *RJNEWS27MARATHI.COM*
नादिक फिल्मस् प्रोडक्शन युट्यूब चॅनल निर्मित धक्का या वेब सिनेमाच्या शूटिंगचा शुभारंभ बाभुळसर बुद्रुक येथे मोठ्या उत्साहात पार पडला. ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे मा. उपाध्यक्ष महेंद्र नागवडे व ग्रामपंचायतीच्या उपसरपंच मोहिनी महेंद्र रणदिवे यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी प्रमुख पाहुण्यांमध्ये रणजीत पाडळे पाटील (पुणे जिल्हा उपाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी), विलास नंदू नागवडे (संचालक, बाभुळसर विकास सोसायटी), अल्लाउद्दीन अलवी (शिरूर तालुका प्रमुख, भाजपा आयटी सेल), दिग्दर्शक धीरज मधुकर कांबळे, सह-दिग्दर्शिका नंदिनी गजभिये, निर्माता हबीब शेख, प्रोडक्शन मॅनेजर किरण कांबळे तसेच ज्येष्ठ अभिनेत्री सुनिता तेली व अभिनेत्री जयश्री तुजारे उपस्थित होते.
तसेच माजी सरपंच नंदाताई कांबळे, संतोष भंडलकर, सुभाष कांबळे, शुभम कांबळे, सोमनाथ जाधव, अलकाताई कांबळे, मीनाताई रणदिवे, वर्षाताई कांबळे, वंदनाताई कांबळे, अभिराज जाधव, सुरेखाताई रणदिवे, जयश्री कांबळे, विलास नागवडे, अनिकेत शितोळे, सुनील भंडलकर आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विशेष पाहुणे म्हणून जनसेवक तुकाराम डफळ (भावी खासदार), प्रदीप भोसले (पुणे शहर उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट), आदित्यराजे मराठे (निर्माता-हिरो), चेतन सागडे (दिग्दर्शक यारी), जयंत जगताप (लेखक-दिग्दर्शक) व श्रीकांत खोमणे (पुणे जिल्हा, भटक्या विमुक्त जाती विकास महामंडळ) यांचा नादिक फिल्म्स प्रोडक्शनच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.
उद्घाटन प्रसंगी बोलताना महेंद्र नागवडे यांनी सांगितले की,
“गावपातळीवरून तसेच ग्रामस्थांच्या सहकार्याने या वेब सिनेमाच्या निर्मितीला प्रोत्साहन दिले जाईल. बाभुळसर सारख्या गावाला चित्रपटसृष्टीत एक वेगळे स्थान मिळेल, ही अभिमानाची बाब आहे.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र रणदिवे यांनी केले तर आभारप्रदर्शन किरण कांबळे यांनी मानले.











