February 9, 2026 5:43 pm

रांजणगाव जिल्हा परिषद-पंचायत गटात छोट्या गावांच्या उमेदवारीचा प्रश्न चिघळला….

रांजणगाव जिल्हा परिषद-पंचायत गटात छोट्या गावांच्या उमेदवारीचा प्रश्न चिघळला

 प्रतिनिधी- Rjnews27marathi.com

रांजणगाव जिल्हा परिषद व पंचायत समिती गणातील निवडणुकीच्या हालचालींना आता वेग आला असून गावा-गावात राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. कार्यकर्त्यांना गळाला घालण्यासाठी मातब्बर नेते सरसावलेले दिसत आहेत. मात्र, या साऱ्या राजकीय घडामोडींमध्ये छोट्या गावांतील कार्यकर्त्यांना खरोखरच उमेदवारी मिळते का? हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

गणातील मोठ्या गावांतील नेते नेहमीच उमेदवारीवर वर्चस्व गाजवतात. ग्रामपातळीवर जनतेशी नाळ जोडून प्रामाणिकपणे काम करणारे लहान गावांतील कार्यकर्ते मात्र या स्पर्धेत मागे पडतात, अशी नाराजी जनतेतून व कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे. “मोठ्या गावातूनच उमेदवार उभा राहिला पाहिजे” ही मानसिकता अद्याप बदललेली नाही, असा आरोप होत आहे.

आर्थिक बळाकडे झुकते पारडे

पक्षनिष्ठा, कार्यकर्त्यांची मेहनत, जनतेशी जिव्हाळा अशा बाबींवर उमेदवार ठरविण्याऐवजी, आर्थिक बळ असलेले किंवा उद्योगपती प्रवृत्तीचे लोकच निवडणुकीत पुढे येतात, असा आरोप कार्यकर्त्यांकडून वारंवार ऐकू येतो. परिणामी, वर्षानुवर्षे पक्षासाठी श्रम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा उत्साह खचतो.

पक्षांतराची कुजबुज सुरू

यामुळे काही इच्छुक उमेदवारांना आपल्या पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यास पक्षांतराचा मार्ग पत्करावा लागेल, अशीही चर्चा रंगू लागली आहे. “पक्षाशी निष्ठा दाखवूनही जर तिकीट मिळत नसेल, तर राजकारणात पुढे जाण्यासाठी पर्याय शोधावा लागतो”, अशी भावना अनेक ठिकाणी उमटताना दिसते.

जनतेचा कस लागणार

आगामी निवडणुकीत जनता या पक्षांतराच्या खेळाला कितपत स्वीकारते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. छोट्या गावांतील उमेदवारांना कोणता पक्ष खऱ्या अर्थाने न्याय देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रांजणगाव गणपतीसारखा राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा गण असल्याने येथे होणारे उमेदवारीचे समीकरण संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरेल, अशी अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Advertisements

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें