February 9, 2026 5:21 pm

घोडेगावात बाप्पाच्या मूर्ती बनविण्याचे काम अंतिम टप्प्यात…

घोडेगावात बाप्पाच्या मूर्ती बनविण्याचे काम अंतिम टप्प्यात

प्रतिनिधी : Rjnews27marathi.com

गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर आला असून आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव (कुंभार गल्ली) येथे बाप्पाच्या मूर्ती बनविण्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. येथील तानाजी शिवराम सोमवंशी यांच्या कारखान्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही शेकडो मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत.

यंदाच्या मूर्तींमध्ये लालबाग, दगडूशेठ, मयूरआसन, कसबा गणपती, टिटवाळा, चिंतामणी आदी प्रकार आकर्षणाचे ठरत आहेत. एक फुटापासून पाच फुटांपर्यंत विविध आकारातील या मूर्तींमध्ये यंदा खास करून पितांबर शाल-फेटा सजावट केलेल्या मूर्तींना जास्त मागणी आहे.

भाविकांची लगबग आणि मूर्तींची वाढलेली किंमत

महाराष्ट्राचा सर्वात मोठा सांस्कृतिक सोहळा गणेशोत्सव २७ ऑगस्टपासून सुरू होत आहे. त्यामुळे भाविकांमध्ये प्रचंड उत्साह असून मूर्ती खरेदीसाठी घाई सुरू झाली आहे.

तथापि, यावर्षी प्लॅस्टर ऑफ पॅरिस व रंग यांच्या दरवाढीमुळे मूर्तींच्या किमतीत तब्बल २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तरीदेखील पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर तसेच अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर, संगमनेर या भागांतून मोठ्या प्रमाणावर मूर्तींची मागणी होत आहे.

पर्यावरणपूरक मूर्तींनाही पसंती

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी अनेक भाविक शाडूच्या मूर्तींची चौकशी करत असल्याने सोमवंशी यांनी यावर्षी शाडूच्या मूर्ती देखील तयार केल्या आहेत.

“मूर्तींच्या किमती वाढल्या असल्या तरी भाविकांचा उत्साह मात्र तसाच ओसंडून वाहताना दिसतो. आपल्या आवडत्या बाप्पाची आगाऊ नोंदणी व खरेदीसाठी मोठी लगबग सुरू आहे,” असे सागर तानाजी सोमवंशी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Advertisements

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें