बाभुळसर बुद्रुक येथे स्वातंत्र्य दिनाचा उत्साहात उत्सव
अल्लाउद्दीन अलवी, शिरूर तालुका प्रतिनिधी
बाभुळसर बुद्रुक (ता. शिरूर, जि. पुणे) |
१५ ऑगस्ट रोजी बाभुळसर बुद्रुक गावात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दिवसाची सुरुवात बाभुळसर बुद्रुक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था येथे ध्वज पूजनाने झाली. त्यानंतर ग्रामपंचायत, संत तुकाराम विकास सोसायटी, आप्पासाहेब पवार माध्यमिक विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कैलासवासी नानासाहेब साबळे ग्रंथालय तसेच म्हसोबावाडी जिल्हा परिषद शाळा (गणेगाव दुमाला) येथे राष्ट्रध्वज पूजन व ध्वजारोहण सोहळे पार पडले.

ग्रामपंचायत कार्यालयात विद्यमान सरपंच दीपालीताई नागवडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक रामचंद्र (अण्णा) नागवडे, बाभुळसर बुद्रुक विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन भरत भाऊ नागवडे, तंटामुक्ती अध्यक्ष अरुण दादा नागवडे, माजी सरपंच गणेश मचाले, राष्ट्रवादी काँग्रेस शिरूर तालुका जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीचे सरचिटणीस जयवंत नागवडे, माजी चेअरमन राजेंद्र कमाजी नागवडे, ह.भ.प. रामदास नागवडे, सदस्य कविता पाटोळे, मनीषा नागवडे, प्रीती नागवडे, माजी उपसरपंच मोहिनी रणदिवे, पोलीस पाटील मीना पाडळे, माजी उपसरपंच सुनील देशवंत, सोमनाथ नागवडे, मारुती नागवडे, ग्रामविकास अधिकारी गायकवाड, शिपाई संतोष भंडलकर, मुख्याध्यापक चौधर सर व शिक्षक वृंद, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यानंतर जिल्हा परिषद शाळेत ध्वज पूजन व ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष काका नागवडे यांच्या हस्ते पार पडले. राष्ट्रगीत झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीत, नाटिका आणि नृत्य आदी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून कार्यक्रमाला रंगत आणली.
या सोहळ्यास ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष किशोर नागवडे, समिती सदस्य, सर्व संस्था, चेअरमन, संचालक मंडळ, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित राहून स्वातंत्र्य दिनाचा उत्साह द्विगुणित केला.











