February 9, 2026 6:03 pm

जवानांनी घेतली भगिनींच्या रक्षणाची शपथ, शाळेचा उपक्रम ठरला कौतुकास्पद…

राखीच्या पवित्र बंधनातून जवानांच्या सेवाभावाला सलाम

पत्रकार :- अल्लाउद्दीन अलवी
राज्य राखीव पोलीस दल प्रशिक्षण केंद्र, नानविज (दौंड) येथे स्व. संजयराव पोपटराव भोसले विद्यालय, निमगाव खलू तर्फे रक्षाबंधन सोहळा

दौंड तालुक्यातील नानविज येथील राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्रात यंदा रक्षाबंधन सोहळा विशेष रंगतदार ठरला. स्व. संजयराव पोपटराव भोसले विद्यालय, निमगाव खलू यांच्या वतीने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रशिक्षणासाठी आलेल्या जवानांना भगिनींनी राख्या बांधून स्नेह, आपुलकी व संरक्षणाच्या पवित्र नात्याचा धागा जुळवला.

जवानांनी घेतली भगिनींच्या रक्षणाची शपथ, शाळेचा उपक्रम ठरला कौतुकास्पद

उपक्रमाला विद्यालयाच्या आदरणीय प्राचार्या सौ. जयश्री देसाई यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत उपस्थिती लावली. तर उपस्थित जवानांनी “आम्ही आमच्या भगिनींच्या सन्मान आणि रक्षणासाठी सदैव तत्पर राहू” अशी शपथ घेतली.

कार्यक्रमाची रूपरेषा, नियोजन आणि प्रभावी सूत्रसंचालन पोलीस निरीक्षक प्रफुल्ल खडपकर यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पोलीस निरीक्षक वसंत गांगोडे यांनी भूषवले. त्यांनी सर्व सहभागी भगिनींना, जवानांना आणि शाळा परिवाराला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

आभार प्रदर्शन विद्यालयाचे शिक्षक श्री. जंजिरे सर यांनी व्यक्त केले. या प्रसंगी सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. धावडे मॅडम, श्री. ठोसरे सर, मुख्याध्यापक श्री. फटाकडे सर आणि सर्व कर्मचारीवृंद यांनी उत्कृष्ट आयोजनात मोलाचा वाटा उचलला.

सोहळ्यातील सर्वात भावनिक क्षण म्हणजे, भगिनींनी एकेक करून प्रत्येक जवानाच्या मनगटावर राखी बांधली आणि त्यांच्या ओवाळणीतून जमा झालेल्या रकमेचा उपयोग करून विद्यालयाने सर्व मुलींना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.

अशा या बंधुत्व, संरक्षण आणि सेवाभावाच्या सुंदर संगमाने रक्षाबंधनाचा खरा अर्थ साकारला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Advertisements

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें