शिरूरमध्ये “यशराज टायर्स” MRF दालनाचे भव्य उद्घाटन
शिरूर (घोडनदी) – पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण येथे अत्याधुनिक सुविधांनी सज्ज “यशराज टायर्स” MRF दालनाचे दिमाखदार उद्घाटन रविवारी पार पडले. हे दालन प्रतिथयश डॉक्टर मछिंद्र नरवडे यांच्या मालकीचे असून उद्घाटन माजी प्रदेशाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि अहमदनगर दक्षिणचे खासदार डॉ. निलेश लंके यांच्या हस्ते संपन्न झाले.
या कार्यक्रमास शिरूर हवेलीचे माजी आमदार अशोक पवार तसेच MRF टायर्स कंपनीचे पुणे जिल्हा प्रमुख अल्फ्रेड जोन्स हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शिरूर, श्रीगोंदा आणि पारनेर परिसरातील वाहनधारकांसाठी हे दालन उपयुक्त ठरणार असून दोनचाकीपासून ते मोठ्या वाहनांपर्यंत सर्व प्रकारचे टायर्स येथे उपलब्ध राहणार आहेत.
दालनाचे व्यवस्थापन युवा उद्योजक यशराज नरवडे यांच्याकडे आहे. मान्यवरांनी आपल्या मनोगतात, व्यवसायातील नाविन्यपूर्ण उपक्रम आणि दर्जेदार सेवा यामुळे “यशराज टायर्स” येत्या काळात अधिक यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वाडेगव्हाणचे सरपंच किशोर यादव, विकास चव्हाण, अमोल चव्हाण, ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील मित्रपरिवार यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन अमोल यादव यांनी केले, तर नरवडे कुटुंबीयांतर्फे रमेश नरवडे आणि माजी सरपंच भानुदास घनवट यांनी उपस्थितांचे आभार मानले.











