February 9, 2026 6:10 pm

शिरूर तालुक्यात मलठण येथे खुले जंगलात बेकायदेशीर तीनपत्ती जुगार खेळणाऱ्या सहा आरोपींवर गुन्हा दाखल…

शिरूर तालुक्यात मलठण येथे खुले जंगलात बेकायदेशीर तीनपत्ती जुगार खेळणाऱ्या सहा आरोपींवर गुन्हा दाखल

शिरूर (दि. 06 ऑगस्ट 2025) | प्रतिनिधी – RJNEWS27MARATHI.COM

शिरूर तालुक्यातील मलठण गावाच्या हद्दीत फॉरेस्ट विभागाच्या मोकळ्या जागेत बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर शिरूर पोलीस स्टेशनच्या पथकाने धाड टाकून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाई महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12 (अ) नुसार करण्यात आली आहे.

फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल संतोष बनसोडे (ब.नं. 1481), शिरूर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 05 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजता, मलठण गावच्या हद्दीत असलेल्या फॉरेस्ट विभागाच्या मोकळ्या जागेत काही इसम बेकायदेशीररित्या पैशावर तीनपत्ती नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यावरून पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाड टाकली असता, खालील सहा आरोपी जुगार खेळताना आढळून आले:

1. आबा विठ्ठल शिंदे (वय 50) – रा. शिंदेवाडी, ता. शिरूर

2. लक्ष्मण सिताराम शिंदे (वय 33) – रा. शिंदेवाडी, ता. शिरूर

3. दादा रकमा कोळपे (वय 38) – रा. शिंदेवाडी, ता. शिरूर

4. अकबर अब्बास पटेल (वय 64) – रा. डोंगरगण, ता. शिरूर

5. शिवाजी कृष्णा शेंडगे (वय 50) – रा. डोंगरगण, ता. शिरूर

6. कारभारी मच्छिंद्र डांगे (वय 54) – रा. सोनेसांगवी, ता. शिरूर

 

या सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) अन्वये गुन्हा क्रमांक 565/2025 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस हवालदार 2592 खेडकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली असून, पुढील तपास पो.हवा. 2436 बनकर यांच्या मार्फत सुरू आहे. गुन्हा सायं. 10:51 वाजता अधिकृतरित्या नोंदवण्यात आला.

या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.

???? अधिक माहितीसाठी भेट द्या: RJNEWS27MARATHI.COM

???? आपल्या भागातील बातम्यांसाठी RJNEWS27MARATHI चे WhatsApp अपडेट्स मिळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Advertisements

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें