February 9, 2026 6:08 pm

तक्रार द्यायला आलेल्या कुटुंबावरच भोसले टोळीचा हल्ला – महिलांनाही सोडलं नाही…

दौंड पोलिस ठाण्यासमोर थेट गुन्हेगारांची दहशत!

तक्रार द्यायला आलेल्या कुटुंबावरच भोसले टोळीचा हल्ला – महिलांनाही सोडलं नाही!

दौंड (ता. ५ ऑगस्ट)
दौंड तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा झळाळता चेहरा असलेल्या दौंड पोलिस ठाण्याच्याच समोर रविवारी (ता. ३ ऑगस्ट) दुपारी एक धक्कादायक घटना घडली. तक्रार देण्यासाठी आलेल्या कुटुंबावर थेट पोलिस ठाण्याच्या गेटसमोरच हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एकाच कुटुंबातील चार जणांना जबर मारहाण करण्यात आली, यामध्ये दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. विशेष म्हणजे, ही हाणामारी एका जुन्या वादातून उफाळून आली होती.

घटनेचा तपशील – बांधाच्या वादातून थेट मारहाण!

बोरीबेल येथील गाडेवाडी गावात बांध कोरण्यावरून सुरू झालेलं भांडण थेट हिंसक हल्ल्यात परिवर्तित झालं. या वादात आकाश रघुनाथ गाडे यांनी पोपट भोसले व रेखा भोसले यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी दौंड पोलिस ठाण्यात धाव घेतली होती.

मात्र तक्रार देऊन बाहेर पडताच, पोलीस ठाण्याच्या गेटसमोरच रोहित पोपट भोसले, वर्जेश पोपट भोसले, पोपट भीमराव भोसले (गाडेवाडी, बोरिवेल) आणि सोमनाथ तोरडमल (भैरोबाचीवाडी, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) यांनी गाडे कुटुंबीयांवर हल्ला चढवला.

महिलांवर हल्ला – माणुसकीला काळीमा!

या हल्ल्यात आकाश गाडे यांच्या डोक्यात दगड फेकून जबर दुखापत करण्यात आली. त्याचा रक्तस्राव झाला. इतकंच नव्हे, तर त्यांच्या आई मंदा गाडे यांच्या डोक्यात स्टीलचे कडे घालून जबर मारहाण करण्यात आली. विद्या गाडे या महिलेलाही हल्लेखोरांनी सोडले नाही.

गुन्हेगारांवर गुन्हा दाखल – तरीही नागरिक भयभीत

या प्रकारानंतर आकाश गाडे यांनी दौंड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चौघांवर – रोहित भोसले, वर्जेश भोसले, पोपट भोसले आणि सोमनाथ तोरडमल – यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

मात्र, पोलिस ठाण्याच्या समोरच जर असा हल्ला होत असेल, तर सामान्य नागरिकांनी सुरक्षिततेसाठी कुठे जायचं? असा सवाल आता स्थानिक नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. दौंड परिसरात या घटनेने खळबळ उडाली असून, कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
न्यायाची मागणी – आरोपींवर कठोर कारवाईची गरज

गावकऱ्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून, गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून उदाहरण ठेवण्याची मागणी होत आहे. महिलांवर पोलिस ठाण्याजवळच हल्ला होतोय, ही अतिशय गंभीर बाब आहे.

(न्यूज अपडेट: घटना अधिक तपासाधीन असून पुढील कारवाईसाठी प्रशासन सज्ज आहे. पोलिस तपासात काय निष्पन्न होतं याकडे सर्वांचे लक्ष आहे.)

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Advertisements

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें