February 9, 2026 5:48 pm

हिलाळ वस्तीतील कौटुंबिक वादातून हल्ला : एकावर कोयत्याने वार, गुन्हा दाखल…

हिलाळ वस्तीतील कौटुंबिक वादातून हल्ला : एकावर कोयत्याने वार, गुन्हा दाखल

शिरूर (प्रतिनिधी) | २५ जुलै २०२५

कवठे येमाई (ता. शिरूर) येथील हिलाळ वस्तीवर २५ जुलै रोजी दुपारी १२.१५ च्या सुमारास घरगुती वादातून गंभीर स्वरूपाची मारहाण झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कवठे येमाई पोलिस ठाण्यात गु.र.नं. 561/2025, भारतीय नवसंहितेच्या (BNS) कलम 118(1), 115(2), 352, 351(2), 351(3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीची माहिती 
या प्रकरणात फिर्याद श्री. प्रशांत बाळासाहेब इचके (वय 32 वर्षे, व्यवसाय – शेती, रा. हिलाळ वस्ती, गांजेवाडी, कवठे येमाई) यांनी दिली आहे. त्यानुसार, दिनांक २५ जुलै रोजी दुपारी ते आपल्या राहत्या घरी पत्नी व आई (शंकुतला) यांच्यासोबत झोपलेले असताना ही घटना घडली.

घटनेचा तपशील 
फिर्यादी प्रशांत इचके यांनी सांगितले की, त्यांचे चुलते बबन किसन इचके आणि चुलती लिलाबाई बबन इचके यांनी त्यांच्या घराच्या किचनच्या खिडकीचे काचे फोडले. हा आवाज ऐकून प्रशांत यांनी बाहेर पाहिले असता बबन इचके यांनी “तुला जिवंत ठेवणार नाही, मला कोर्टाने सोडले आहे, तू माजलास आहेस” असे म्हणत कोयत्याने डोक्यावर वार केला. मात्र प्रशांत यांनी तो वार उजव्या हातावर झेलल्याने मोठा अनर्थ टळला. त्याचवेळी लिलाबाई यांनी त्यांच्या पायावर व शरीरावर मारहाण केली आणि शिवीगाळ, दमदाटी करून घटनास्थळावरून पळून गेले.

पोलीस कारवाई 
या प्रकरणी प्रशांत इचके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बबन आणि लिलाबाई इचके यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपास पोहवा/850 वारे हे करीत असून, गुन्हा दाखल पोहवा/1252 भोते यांनी घेतला आहे.

या हल्ल्याचे कारण कौटुंबिक वाद असण्याची शक्यता असून, पोलिस अधिक तपास करत आहेत. गावात या घटनेमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात असून, लवकरच कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मिळाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Advertisements

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें