????️ दोन होतकरू तरुणांचा अपघाती मृत्यू… नागरगाव व आंधळगावावर शोककळा… चौफुला महामार्ग बनतोय मृत्यूचा सापळा ????️
शिरूर (प्रतिनिधी) –
“सकाळची वेळ होती… सवयीप्रमाणे दोन तरुण आपल्या कुटुंबासाठी, रोजच्या उपजीविकेसाठी निघाले होते… परत येणार, ही कल्पनाही कुणालाही आली नव्हती… पण नियतीने आपला काळा डाव खेळला आणि दोन कुटुंबांचे आधारच गमावले गेले…”

नागरगाव – चौफुला – शिरूर महामार्गावरील आंधळगावाजवळ आज सकाळी ७ वाजता एक भीषण अपघात घडला. या अपघातात दोन होतकरू तरुणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
मृतांमध्ये आंधळगाव येथील विक्रम ज्ञानेश्वर सकट (वय ३०) आणि नागरगाव येथील संदीप रोहिदास मदने (वय ३२) यांचा समावेश आहे.
दोघेही कामासाठी एमआयडीसी करडे येथे दुचाकीने जात असताना भरधाव वेगात येणाऱ्या पिकप वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की वाहनाने त्यांना जवळपास १०० फूट फरफटत नेले, आणि जागीच प्राण घेतले.
या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरगाव व आंधळगाव या दोन्ही गावांवर शोककळा पसरली आहे. संदीप मदने आणि विक्रम सकट हे दोघेही कुटुंबाचा आधार होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दोघेही आपल्या घरासाठी राबत होते. त्यांच्या जाण्याने एक वडील, एक पत्नी, लहानगी मुले आणि आईच्या डोळ्यातील आशा हरपल्या आहेत…
????️ संदीप मदने हा नागरगावमधील सहावा अपघाती बळी ठरला आहे.
????️ चौफुला – शिरूर महामार्ग रस्त्याचा विस्तार झाला, पण त्यावर अपघात टाळण्यासाठी कोणतीही सुरक्षा यंत्रणा नाही.
हा महामार्ग आता “मृत्यूचा सापळा” बनत चालला आहे.
गावकऱ्यांनी प्रशासनाकडे रोष व्यक्त केला आहे. अनेकांनी सोशल मीडियावर ह्या रस्त्यावर स्पीड ब्रेकर, सीसीटीव्ही आणि ट्रॅफिक पोलिसांची मागणी केली आहे.
????️ “रस्ते होतात, पण माणसं हरवतात, ही विकासाची कोणती किंमत?” – अशा भावना आता गावात उमटू लागल्या आहेत.
गावकऱ्यांच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नाहीत. दोन घरात चूल पेटणार नाही, दोन बायका विधवा झाल्या, दोन आयांच्या पोटचे तुकडे गेले…
हे अपघाती बळी केवळ आकडे नाहीत… ही आहेत दुःखाची जीवघेणी किंमत!
आता तरी प्रशासन जागं होईल का?
✍️ बातमीसाठी: RJNEWS27MARATHI.COM
????️ बातमीदार: रमेश मनोहर बनसोडे











