शिरूरमधून १९ वर्षीय युवती बेपत्ता – कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शिरूर बायपास येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंपाच्या परिसरातून एक १९ वर्षीय युवती अचानक बेपत्ता झाली आहे. या घटनेमुळे तिच्या कुटुंबियांसह परिसरात चिंतेचं वातावरण पसरलं आहे.
बेपत्ता झालेल्या युवतीचं नाव आरती दत्ताराव शेळके असून ती मूळची खर्शी, ता. पुसद, जि. यवतमाळ येथील आहे. सध्या ती आपल्या कुटुंबासोबत शिरसगाव काटा, ता. शिरूर, जि. पुणे येथे वास्तव्यास होती. 06 जुलै 2025 रोजी रात्री 11:30 वाजता ती कोणालाही काहीही न सांगता शिरूर बायपासजवळून अचानक गायब झाली. या घटनेची नोंद शिरूर पोलीस स्टेशन येथे रजि. नं. 110/2025 अन्वये करण्यात आली आहे.
आरतीचं वर्णन पुढीलप्रमाणे आहे – तिचे केस काळे आणि लांब आहेत, रंग गोरा, नाक सरळ, गळ्यात लाल धाम्यत रुद्राक्षाची माळ आहे. कानात बेनटेक्सचे फुल, डाव्या पायाच्या गुडघ्याखाली काळा जन्मखूण आहे, नाकात चमकी असून डाव्या पायात काळा धागा बांधलेला आहे. तिने गुलाबी रंगाचा टॉप आणि पिवळ्या रंगाची लैगीन पँट परिधान केली होती. ती मराठी व हिंदी भाषेत बोलते व तिचं शिक्षण बारावीपर्यंत झालं आहे.
या घटनेची माहिती आरतीची आई सुनिता दत्ताराव शेळके (वय ४५ वर्षे) यांनी पोलीसांना दिली. त्यांनी पोलिसांत दिलेल्या निवेदनात नमूद केलं की, त्यांच्या मुलीचा कुठेही थांगपत्ता लागत नसून ती कोणासोबत गेली, का गेली याची काहीही माहिती नाही. त्यांच्या संपर्क क्रमांकावर (मो. ९५२९३३५९५७) कोणी काही माहिती असल्यास संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
या प्रकरणाचा तपास सफौ साबळे करत आहेत आणि पोहवा मोरे यांनी याची नोंद घेतली आहे. पोलिसांनी या घटनेची तातडीने दखल घेतली असून शोधमोहीम सुरु आहे.
आपणास जर आरती शेळके हिच्याबाबत कोणतीही माहिती असल्यास कृपया तत्काळ शिरूर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा.