July 17, 2025 4:52 am

राजगुरुनगर सहकारी बँक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा सहकार विभाग — सहकार चळवळीला नवा दिशा!

राजगुरुनगर सहकारी बँक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा सहकार विभाग — सहकार चळवळीला नवा दिशा!

राजगुरुनगर | प्रतिनिधी
सहकार क्षेत्रातील एक महत्त्वाची घडामोड ठरावी अशी घटना नुकतीच घडली आहे. नितीन पांडुरंग गुरव यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश सहकार विभागाच्या सरचिटणीसपदी निवड झाली असून, त्यांच्या या निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे. या निमित्ताने राजगुरुनगर सहकारी बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. सागर शेठ पाटोळे यांनी गुरव यांचा सत्कार करून हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 

 

नितीन गुरव हे सहकार क्षेत्रातील जुने जाणते कार्यकर्ते असून, त्यांनी अनेक वर्षे सहकारी संस्थांमध्ये काम करत सहकार चळवळीला बळ दिले आहे. त्यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार विभागाने सामान्य सभासदांपर्यंत नवीन योजना पोहोचवणे, आर्थिक सक्षमीकरण घडवणे आणि सहकारी संस्था बळकट करणे हे प्रमुख उद्दिष्ट ठेवलं आहे.

सहकारातून सशक्त समाजाचा मार्ग

गुरव यांनी यावेळी बोलताना सांगितले की,सहकार हा ग्रामीण आणि निमशहरी भागातील आर्थिक विकासाचा कणा आहे. या माध्यमातून रोजगार, बचत, पतपुरवठा, आणि पारदर्शक व्यवहार घडवून आणता येतात. सहकार चळवळीला नव्या पिढीकडून ऊर्जा मिळावी, या हेतूने आम्ही आधुनिक तंत्रज्ञान आणि नवकल्पनांवर भर देणार आहोत.” राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सहकार विभागाच्या माध्यमातून सहकाराची नवीन धोरणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे तसेच सहकारी सभासद साठी योजना राबवून आर्थिक सक्षमीकरण करणे, सहकार चळवळ चांगल्या प्रकारे बळकट करून सर्वसामान्य जनते साठी नवीन धोरणे योजना राबवून तळागाळापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस सहकार विभाग पोहोचवणे असे उद्दिष्ट त्यांनी डोळ्यासमोर ठेवले आहे

राजगुरुनगर सहकारी बँक, जी स्थानिक आर्थिक विकासाची एक महत्वपूर्ण संस्था ठरली आहे, तिनेही सहकारात नव्याने नेतृत्व घेतले आहे. अध्यक्ष सागर पाटोळे यांनी बँकेच्या वतीने सांगितले की, “आम्ही फक्त पतपुरवठा करणार नाही, तर सभासदांच्या आर्थिक साक्षरतेसाठी कार्यशाळा, महिला बचतगटांसाठी योजना आणि शेतकरी हिताच्या योजना राबवणार आहोत.

सहकाराच्या नव्या पर्वाची सुरुवात

नितीन गुरव यांच्या नियुक्तीमुळे सहकार क्षेत्रात एक सकारात्मक ऊर्जेचा संचार झाला आहे. ग्रामीण भागात सहकार क्षेत्र अधिक सक्षम करून, त्याद्वारे समाजात आर्थिक समतेचा विचार रूजवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस करत आहे.

ही निवड केवळ राजकीय पदाची नसून, सहकाराला नवसंजीवनी देणाऱ्या कार्यकर्त्याची जबाबदारी असल्याचे खुद्द गुरव यांनी स्पष्ट केले.

संपादकीय टिप्पणी-

सहकार ही एक चळवळ आहे, केवळ आर्थिक संस्था नाही. जेव्हा राजकीय पक्ष आणि सहकारी संस्था एकत्र येतात, तेव्हा त्यातून जर समाजोन्मुख आणि पारदर्शक धोरणं अमलात आली, तर खऱ्या अर्थाने विकास होतो.

Leave a Comment

और पढ़ें

विद्याधाम प्रशालेचा नवा यशविक्रमी टप्पा! शिष्यवृत्ती परीक्षेत ६१ विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीत घोडदौड ९ विद्यार्थ्यांचे राज्य गुणवत्ता यादीत नाव – वेदांश उदमले राज्यात तिसरा, जिल्ह्यात प्रथम…

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

विद्याधाम प्रशालेचा नवा यशविक्रमी टप्पा! शिष्यवृत्ती परीक्षेत ६१ विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीत घोडदौड ९ विद्यार्थ्यांचे राज्य गुणवत्ता यादीत नाव – वेदांश उदमले राज्यात तिसरा, जिल्ह्यात प्रथम…