निमगाव दुडे येथील फॉरेस्ट परिसरातून ट्रान्सफॉर्मर चोरी; अंदाजे ७०,००० रुपयांचे नुकसान
शिरूर प्रतिनिधी –
शिरूर, पुणे – शिरूर तालुक्यातील निमगाव दुडे परिसरात 29 जून 2025 रोजी रात्री ते 30 जून सकाळी दरम्यान अज्ञात चोरट्यांनी फॉरेस्ट विभागाच्या मोकळ्या जागेतील दोन ट्रान्सफॉर्मर फोडून कॉपर वायरींची चोरी केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे सुमारे 70,000 रुपयांचे नुकसान झाले आहे.
ही बाब उमेर निजामउद्दीन शेख (वय 32, राहणार मलठण, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद केली आहे. फिर्यादी व्यवसायाने नोकरी करणारे असून, त्यांनी नमूद केल्यानुसार, चोरीस गेलेला मालात दोन 22/100 केव्ही क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर आहेत. त्यापैकी एकावर चौधरी DTC/4055186 आणि दुसऱ्यावर पिंगट DTC/555677 अशी नावे आहेत. हे दोन्ही ट्रान्सफॉर्मर फोडून त्यातील 90 किलो कॉपर वायरी काढून नेण्यात आल्या असून, एकूण अंदाजित किंमत प्रत्येकी 35,000 रुपये इतकी आहे.
याशिवाय, ट्रान्सफॉर्मरमधील सुमारे 300 लिटर तेल देखील जमीनदोस्त करण्यात आले असून, इतर साधनसामुग्रीचीही तोडफोड करण्यात आली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात 1 जुलै रोजी रात्री 9:15 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्ह्याची नोंद क्रमांक 43/2025 अशी आहे.
या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार उबाळे (क्र. 1898) हे करत असून, प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. चोरीमागील अज्ञात आरोपीचा शोध सुरू असून, स्थानिक पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तपास पद्धती वापरून तपासाची चक्रे फिरवली जात आहेत.