छोट्या गावातून जिल्हास्तरावर मोठी झेप: हरीमामा फराटे पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे सेक्रेटरी नियुक्ती
मांडवगण फराटा | शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा या छोट्याशा गावातून व्यवसाय आणि संघटनात्मक कार्यात झपाट्याने पुढे येणारे हरीमामा फराटे यांची पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या मुख्य कार्यकारिणीत सेक्रेटरी (सचिव) म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या यशामागे सातत्यपूर्ण मेहनत, प्रामाणिक कार्यशैली आणि छोट्या व्यापाऱ्यांसाठी त्यांनी उचललेली बांधिलकी आहे.
हरीमामा फराटे यांनी आपल्या संघटनात्मक कारकिर्दीची सुरुवात तालुक्यातील छोट्या पदावरून केली होती. त्यांनी गाव आणि तालुका स्तरावर व्यापाऱ्यांचे प्रश्न प्रामाणिकपणे मांडले आणि त्या समस्यांवर उपाय शोधण्याचे कार्य केले. त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना तालुका उपाध्यक्षपद देण्यात आले. त्यानंतर जिल्हा स्तरावर संपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडताना त्यांनी अधिक व्यापाऱ्यांशी नातं जोडले.
संघटनेने त्यांच्या कार्याची पावती म्हणून त्यांची जिल्हा सेक्रेटरी पदासाठी निवड केली. पुणे येथील सातव हॉल, सहकारनगर येथे नुकत्याच पार पडलेल्या पदग्रहण समारंभात हा निर्णय जाहीर करण्यात आला. या कार्यक्रमाला कॅट (कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स) या राष्ट्रीय संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष व पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री. सचिन निवगुणे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमास पुणे शहर अध्यक्ष विकासजी मुंदडा, बापूसाहेब गायकवाड, नवनाथ सोमसे, अजित चंगेडीया, दत्ता जाधव, जनरल सेक्रेटरी रीजवान खान, महिला शहर अध्यक्षा वैशालीताई माळी, अश्विनी खांडेकर, वर्षा कानिटकर यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि व्यापारी उपस्थित होते.
हरीमामा फराटे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “संघटनेच्या माध्यमातून आता तालुक्याच्या शेवटच्या वाड्यावस्तीत जाऊन व्यापाऱ्यांपर्यंत मदत पोहोचवणार आहे. अन्नधान्य प्रशासन, काटेविधान मापन विभाग आणि इतर शासकीय यंत्रणांच्या सहकार्याने व्यापाऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरे घेणार आहोत.”
त्यांच्या या निवडीमुळे संपूर्ण शिरूर तालुक्यात आणि मांडवगण फराटा गावात आनंदाचे वातावरण आहे. एका छोट्या गावातून सुरू झालेली त्यांची वाटचाल आता जिल्हास्तरावर पोहोचली आहे, हे अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे
मांडवगणच्या ‘हरीमामा’चा जिल्हा सचिव पदापर्यंत प्रवास!”