शिस्तीच्या दिशेने पाऊल! मांडवगण फराटा बाजारात ‘होमगार्ड’ची नियुक्ती – वाहतूक गोंधळावर रामबाण उपाय
मांडवगण फराटा (ता. शिरूर, जि. पुणे):
शिरूर तालुक्यातील पंचक्रोशी भागात मध्यवर्ती ठिकाणी वसलेले मांडवगण फराटा हे गाव केवळ स्थानिक नव्हे, तर परिसरातील पाच-सहा गावांसाठीही व्यवहाराचे प्रमुख केंद्र बनले आहे. येथील शुक्रवारचा बाजार हा वर्षानुवर्षे गर्दीने ओसंडून वाहतो. मात्र याच बाजारात मागील काही काळापासून बेशिस्त वाहतूक आणि पार्किंगमुळे मोठा गोंधळ निर्माण होत आहे.
गोंधळाची पार्श्वभूमी
बाजार तळ असूनही अनेक व्यापारी थेट रस्त्यावरच आपली दुकाने थाटतात. यासोबतच बाजारात येणाऱ्या ग्राहकांच्या दुचाकी गाड्यांची मनमानी पार्किंग, रस्त्यावरून धावणारी मोठी वाहने – यामुळे नागरिक, प्रवासी आणि व्यापारी यांच्यात अनेकदा वादविवादाचे प्रसंग घडतात. बाभूळसर रस्ता, काष्टी मार्ग आणि इतर प्रमुख वाहतूक मार्ग यामुळे हे ठिकाण वाहतुकीच्या दृष्टीनेही अतिशय महत्त्वाचे असून, अपघाताची शक्यता सतत निर्माण होते.
ग्रामपंचायतीचा स्तुत्य निर्णय – ‘होमगार्ड’ची नियुक्ती:
ही अस्वस्थ स्थिती लक्षात घेता मांडवगण फराटा ग्रामपंचायतीने मोठा निर्णय घेतला आहे ,सरपंच समीक्षा अक्षय पाटील फराटे ,उपसरपंच अमोल शितोळे आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या एकमताने शुक्रवारी होणाऱ्या बाजारासाठी ‘होमगार्ड’ची नियुक्ती करण्यात आली आहे. दीपक चौघुले या होमगार्डची बाजार व्यवस्थापनासाठी नियुक्ती करून गर्दी नियंत्रण आणि वाहतूक शिस्त या गोष्टींकडे पाऊल उचलले आहे…
होमगार्डच्या पहिल्या दिवशी मान्यवरांचा उत्स्फूर्त सहभाग:
आज दिनांक 27 जून 2025 रोजी, दीपक चौघुले यांनी पहिल्यांदा कामाचा शुभारंभ केला. त्यांचे प्रोत्साहन आणि स्वागत करण्यासाठी गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते:
अमोल शितोळे (उपसरपंच).अक्षय पाटील फराटे.हरिमामा फराटे (पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ सेक्रेटरी).विजय फराटे, राजेंद्र जगताप, गौरव पवार, अनिल कोकरे, सागर काकडे, विजय तट्टू, योगेश फराटे.पत्रकार विठ्ठल गवळी (पुण्यनगरी).पत्रकार रमेश बनसोडे सह्याद्रीचा राखणदार(RJ News)
प्रशंसनीय पाऊल, अनुकरणीय उपक्रम:
या उपक्रमामुळे बाजारातील अराजकता कमी होऊन वाहतुकीला सुबत्ता मिळणार आहे. नागरिकांचाही या निर्णयाला सकारात्मक प्रतिसाद असून, भविष्यातील अपघात व वादविवाद रोखण्यासाठी हा होमगार्ड एक महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.
गावाच्या सुशासनाच्या दिशेने उचललेले हे पाऊल संपूर्ण शिरूर तालुक्यासाठी एक आदर्श ठरू शकते. भविष्यात या उपक्रमाचा विस्तार करून आणखी काही ठिकाणी अशीच शिस्तीची नांदी होण्याची अपेक्षा आहे.
🖊️ बातमी प्रतिनिधी: रमेश बनसोडे (RJNEWS27MARATHI.COM)
📸 छायाचित्रे व संकलन: स्थानिक वार्ताहर टीम