अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या राष्ट्रीय अधिवेशनाची जय्यत तयारी – प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा
१७ व १८ सप्टेंबर २०२५ रोजी मराठवाडा मुक्तिसंग्राम, लातूर येथे होणार भव्य सोहळा
विजय कांबळे – प्रतिनिधी
नागरगाव (प्रतिनिधी) – अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती आणि ब्रीक्स मानव अधिकार मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने १७ व १८ सप्टेंबर २०२५ रोजी लातूर येथील मराठवाडा मुक्तिसंग्राम मैदानावर राष्ट्रीय अधिवेशन व विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसीय भव्य सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात असून, समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून ही माहिती दिली.
कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे:
१७ सप्टेंबर २०२५:
- सकाळी: मराठवाडा मुक्तिसंग्रामात प्रमुख उद्घाटन सोहळा
- दुपारी: राष्ट्रीय स्तरावरील बैठकीचे आयोजन
- संध्याकाळी: सांस्कृतिक कार्यक्रम आणि देशभक्त गीते
१८ सप्टेंबर २०२५:
- सकाळी: पदाधिकार्यांचा सत्कार आणि मनोगत व्यक्त सत्र
- विविध राज्यांतील प्रतिनिधींचे मनोगत व अनुभव कथन
प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा यांनी सांगितले की, काही पदाधिकारी १७ तारखेचा कार्यक्रम झाल्यानंतर लगेच निघून जातात, मात्र यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी दोनही दिवस उपस्थित राहणे बंधनकारक राहील. कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने होणार असून महिलांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र निवास व्यवस्था आणि सीसीटीव्ही निगराणी करण्यात आली आहे.
देशभरातून प्रतिनिधींची उपस्थिती
दिल्ली, जम्मू-कश्मीर, उत्तराखंड, पंजाब, बिहार, झारखंड, ओडिशा, गोवा, पाँडिचेरी, तामिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेश, तेलंगणा, लेह लडाख, कर्नाटक, राजस्थान, नागालँड, मणिपूर, आसाम, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा अशा विविध राज्यांतील पदाधिकाऱ्यांनी १७ तारखेला लातूरला पोहोचण्यासाठी आधीच रेल्वे व हवाई तिकिटांची नोंदणी केली आहे.
जम्मू-कश्मीरच्या महिला अध्यक्षा अरिफा जान, लेह लडाखच्या अध्यक्षा इशा यांग झोम, आणि जम्मू-कश्मीर प्रदेश अध्यक्ष आर.सी. शर्मा यांच्याशी राष्ट्रीय अध्यक्ष खंडापुरकर बाबांनी आजच संवाद साधल्याचेही त्यांनी नमूद केले.
विशेष सन्मान सोहळा
या अधिवेशनात पाकिस्तानच्या तुरुंगातून सुटलेले भारतीय देशभक्त तसेच वीर पत्नींचा विशेष सन्मान करण्यात येणार असल्याचे खंडापुरकर बाबांनी सांगितले. हे अधिवेशन सामाजिक जागृती, भ्रष्टाचार निर्मूलन आणि राष्ट्रीय ऐक्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
या कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी राष्ट्रीय सरचिटणीस आमोल नान्नजकर (मो. ९०७५३५९०७५) यांच्याशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क:
प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा
राष्ट्रीय अध्यक्ष
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती
ब्रीक्स मानव अधिकार मिशन