अपघाताने कोसळला संसार! पुण्याच्या दिशेने जाणारा छोटा डंपरच्या धडकेत १७ वर्षीय मुलाचा मृत्यू, दोघेजण गंभीर जखमी
गणेगाव दुमाला (ता. शिरूर, जि. पुणे) | प्रतिनिधी- अल्लाउद्दीन अलवी
“सकाळी हसतमुखाने कामासाठी गेलेली लेकरं सायंकाळी हॉस्पिटलमध्ये मृतावस्थेत आणि गंभीर जखमी अवस्थेत पाहायला मिळाल्याचा क्षण कोणत्याही पालकासाठी दुःखाचा असतो. अशाच एका अपघाताने गणेगाव दुमाला गावावर शोककळा पसरली आहे.”
गणेगाव दुमाला येथील शेतकरी श्री. संतोष बाजीराव बोरवडे यांचा मुलगा गणेश संतोष बोरवडे (वय १७) व त्याचे मित्र यश नितीन जाधव (वय १७) आणि रोशन नितीन बोरवडे (वय २०) हे तिघे पुण्यात कामासाठी मोटारसायकलने गेले होते. परंतु संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावरील वाखरी (ता. दौंड) येथील हॉटेल निर्माण समोर छोटा डंपरने त्यांच्यावर पाठीमागून जोरदार धडक दिली.
अपघात इतका भीषण होता की, यश नितीन जाधव या तरुणाने जागीच प्राण सोडले. तर रोशन बोरवडे याला डोक्याला आणि छातीत गंभीर दुखापत झाली असून गणेश बोरवडे याच्या गुडघ्याला आणि इतर भागांना मार लागला आहे. अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळावरून पळून गेला.
अपघातग्रस्त तरुणांना वाखरी येथील स्थानिक नागरिकांनी तत्काळ पारधी चौफुला येथील हर्ष हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु डॉक्टरांनी यश जाधवला मृत घोषित केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
या प्रकरणी गणेशचा वडील श्री. संतोष बोरवडे यांनी केडगाव पोलीस चौकी येथे फिर्याद दाखल केली आहे. डंपर क्रमांक आणि चालकाचे नाव अद्याप अज्ञात असून, पोलिसांनी अज्ञात डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
एक घरातला दिवा विझला, आई-वडिलांची काळीज फाटली…
गणेशच्या घरात शोककळा पसरली आहे. आई सरस्वती बोरवडे आणि वडील संतोष बोरवडे यांचे दुःख शब्दांत मावणारे नाही. “सकाळी पोरगं हसत गेलं… संध्याकाळी यश गेलाच… आणि गणेशला पाहून काळजात चर्र झालं,” अशा शब्दांत संतोष बोरवडे यांचा आक्रोश कोणीही विसरू शकणार नाही.
गावकरी आणि नातेवाईक या अपघातानंतर मोठ्या संख्येने हॉस्पिटलमध्ये धावले. पोलिसांनी अपघातस्थळी जाऊन तपास सुरू केला आहे.
वाढत्या वेगाच्या वाहतुकीने घेतला आणखी एक बळी…
पुणे-सोलापूर महामार्गावर वेगाने धावणारी वाहने, डंपर चालकांचा बेदरकारपणा आणि रहदारीचे नियम पाळण्याकडे होणारे दुर्लक्ष यामुळे अशा दुर्घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. प्रशासनाकडून कडक कारवाई आणि वाहतुकीच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.
आपल्या गावातील या दु:खद घटनेबाबत तुमचे मत, प्रतिक्रिया किंवा माहिती आम्हाला rjnews27marathi.com वर कळवा.
[RJNEWS27MARATHI.COM]
संपर्क: rjnews27marathi@gmail.com