“लहानगी अनुष्काचं मोठं धाडस! – आमदार माऊली आबा कटके यांच्या हस्ते सन्मान”
मांडवगण फराटा (प्रतिनिधी अल्लाउद्दीन अलवी):
शिरूर हवेलीचे आमदार मा. माऊली आबा कटके यांनी मांडवगण फराटा येथील अनुष्का धनंजय फराटे हिच्या धाडसी कृतीचे विशेष कौतुक करत तिला सन्मानित केले. अवघ्या वयात दाखवलेले हे धैर्य संपूर्ण तालुक्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
अनुष्का ही मांडवगण फराटा (ता. शिरूर, जि. पुणे) येथील छत्रपती वि का सोसायटीचे संस्थापक चेअरमन संभाजी नाना फराटे यांची नात आणि धनंजय फराटे यांची कन्या आहे. काही दिवसांपूर्वी कोळगाव डोळस रोडवरील पुलावरून जात असताना गोपीनाथ आबा शेलार या वृद्ध नागरिकाचा पाण्याच्या प्रवाहात तोल जाऊन अपघात होण्याचा धोका निर्माण झाला होता. अनुष्काने प्रसंगावधान राखत, कोणतीही भीती न बाळगता त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले. तिच्या या धाडसाची चर्चा संपूर्ण भागात झाली.
या धाडसी कृतीचे महत्त्व ओळखून शिरूर हवेलीचे लोकप्रिय आमदार माऊली आबा कटके यांनी स्वतः मांडवगण फराटा येथे येऊन अनुष्काच्या घरी जाऊन तिचा सन्मान केला. त्यांनी अनुष्काला फुलांचा हार, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविले.
या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांची यादी देखील लक्षणीय होती. दादा पाटील फराटे, सुधीर फराटे, राहुल रणदिवे, बाळकाका फराटे, प्रभाकरअण्णा घाडगे, राजेंद्र गदादे, विरेंद्र शेलार, कुंडलीक शितोळे, शरद साठे, संतोष पाटील फराटे, निलेश इथापे, राजेंद्र दरेकर, अक्षय पाटील फराटे, महेंद्र नागवडे, ऋषी निंबाळकर, गणेश फराटे, प्रताप फराटे, संतोष मोरे, बंटी नागवडे, डॉ. मनोज शेलार, धनंजय शेलार, विठ्ठल कळसकर आदी मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली.
या वेळी सुधीर फराटे यांनी आमदार कटके साहेबांना निवेदन देत, अनुष्काच्या धाडसाबद्दल महाराष्ट्र शासनाच्या बाल शौर्य पुरस्कारासाठी तिची शिफारस करण्याची मागणी केली.
कार्यक्रमाच्या शेवटी छत्रपती वि का सोसायटीचे चेअरमन मनोहर फराटे यांनी सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार मानले.
हे धाडस प्रेरणादायी ठरले असून, लहान वयातही मोठे कार्य शक्य आहे हे अनुष्काने दाखवून दिले आहे.