July 17, 2025 5:40 am

पोटात भूक, डोळ्यात स्वप्नं… आणि अपघाताच्या वेदना – छोट्या रोहनच्या उपचारासाठी मदतीचा हात हवाय!”

 

पोटात भूक, डोळ्यात स्वप्नं… आणि अपघाताच्या वेदना – छोट्या रोहनच्या उपचारासाठी मदतीचा हात हवाय!”

प्रतिनिधी – अल्लाउद्दीन अलवी | बाभुळसर बुद्रुक, ता. शिरूर, जि. पुणे | दि. १२ जून

बाभुळसर बुद्रुक या ग्रामीण भागातील एक नाजूक मनाचा, स्वप्नांनी भारलेला आठ वर्षांचा मुलगा, रोहन किशोर जाधव… घरात गरिबी, आई-वडील रोजंदारीने मजुरी करून पोट भरत असले तरी त्याच्या डोळ्यात मात्र उज्वल भविष्यातलं एक निरागस स्वप्न होतं. रोजच्या खेळण्यातून त्याने कधी आपल्या दुःखाकडे बोट दाखवलं नाही. पण एक अपघात त्याच्या आयुष्याला वेदनेच्या गर्तेत लोटून गेला…

रोहनचा पोट आणि छातीला गंभीर दुखापत झाली असून, सध्या तो बारामती येथील मुथा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. डॉक्टरांनी सांगितले की त्याचं तात्काळ ऑपरेशन गरजेचं आहे, ज्यासाठी सुमारे ₹१,२०,००० इतका खर्च अपेक्षित आहे. परंतु, रोजंदारीवर जीवन जगणाऱ्या त्याच्या आई-वडिलांसमोर ही रक्कम म्हणजे Everest सर करण्याइतकी कठीण वाट आहे. कुटुंब फक्त छपराच्या घरात राहते, गरिबीने त्यांची पाठ सोडलेली नाही.

गाव एकवटला… दिला एक हात मदतीचा!

गावाच्या मनात दाटून आलं – “हा आपला रोहन आहे!” आणि मग सुरू झाली मदतीची साखळी. सोशल मीडियावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर तालुका सोशल मीडियाचे अध्यक्ष सतीश नागवडे यांनी एक भावनिक आवाहन केलं, आणि त्यावर समाजातील दानशूरांनी जलद प्रतिसाद दिला.

महेंद्र मोटेसाहेब (२१००),

रणजीत पाडळे पाटील (१०००),

अमोल नागवडे, आदेश साळुंखे, अमित चांदगुडे, अल्लाउद्दीन अलवी पत्रकार,

मनोहर मचाले (चेअरमन), महादेव राक्षे, जालिंदर (आण्णा) नागवडे,

उद्योजक अभिमन्यू नागवडे, सुप्रिया गोरे (पुणे), नूर महंमद सय्यद (सौदी अरेबिया)…

… अशा कितीतरी दात्यांनी पुढे येऊन आपल्या क्षमतेप्रमाणे आर्थिक मदत केली.

एक हात मदतीचा – केवळ रक्कम नव्हे, माणुसकीचा झरा

या मोहिमेमागे केवळ मदत नव्हे, तर एक भावना आहे – “कोणाचंही मूल रस्त्यावर वेदनेत झुंजत राहू नये!”
रोहनसारख्या मुलांच्या आयुष्यातील स्वप्नं अपघातांमुळे विरून जाऊ नयेत, यासाठी समाज म्हणून आपण एकत्र येत आहोत, हे आज सिद्ध होत आहे.

आपणही मदत करू शकता – एक हात, एक आशा!

जो कोणी या परिवाराला मदतीचा हात देऊ इच्छितो, त्यांनी सुनिता किशोर जाधव (रोहनची आई) यांच्या PhonePe नंबर – ७४९८२७०३८४ वर थेट मदत पाठवू शकता.

आज रोहन आहे, उद्या कोण?.समाजात असे हजारो रोहन आहेत, ज्यांच्या डोळ्यांतील स्वप्नं हीच आपल्या माणुसकीची खरी परीक्षा घेत आहेत. आज आपण एक हात दिला, तर उद्या या देशात एक चांगला माणूस उभा राहू शकतो. कारण दुःख केवळ कुटुंबाचं नसतं, ते साऱ्यांचं असतं.

✍️ – अल्लाउद्दीन हुसेन अलवी, पत्रकार | RJ NEWS27MARATHI.COM
📞 संपर्क: ७४९८२७०३८४ (PhonePe)

Leave a Comment

और पढ़ें

विद्याधाम प्रशालेचा नवा यशविक्रमी टप्पा! शिष्यवृत्ती परीक्षेत ६१ विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीत घोडदौड ९ विद्यार्थ्यांचे राज्य गुणवत्ता यादीत नाव – वेदांश उदमले राज्यात तिसरा, जिल्ह्यात प्रथम…

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

विद्याधाम प्रशालेचा नवा यशविक्रमी टप्पा! शिष्यवृत्ती परीक्षेत ६१ विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीत घोडदौड ९ विद्यार्थ्यांचे राज्य गुणवत्ता यादीत नाव – वेदांश उदमले राज्यात तिसरा, जिल्ह्यात प्रथम…