June 15, 2025 8:21 am

भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या व मार्गदर्शन

 भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या व मार्गदर्शन शिबीर संपन्न
अवैद्य धंदे बंद करण्याचा नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा निर्धार

प्रतिनिधी – विजय कांबळे | नागरगाव | दिनांक : 03 जून 2025

शिरूर नगर परिषद सभागृह येथे दिनांक 01 जून 2025 रोजी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती व ब्रिक्स ह्यूमन राइट्स मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मार्गदर्शन शिबिर व नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे मार्गदर्शन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. प्रदीप पाटील खंडापुरकर व राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री. बाबुराव क्षेत्रे पाटील यांनी केले.

या वेळी मंचावर पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन खंडागळे, पुणे जिल्हा सोशल मीडिया प्रमुख अभिजीत चरपे पाटील, पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष योगेश भोसले व शिरूर तालुका संघटक मुनाफ पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून झाली. त्यानंतर शिरूर तालुक्यातील नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या पार पडल्या. विशेष म्हणजे, यावेळी महिला पदाधिकाऱ्यांचीदेखील नियुक्ती करून संघटनेच्या समावेशकतेचा ठसा उमटवण्यात आला.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी शपथ घेतली की, शिरूर तालुक्यातील अवैद्य दारू, मटका, जुगार यांसारखे दोन नंबरचे अनैतिक व्यवसाय मुळासकट बंद करण्यासाठी संघटना कटिबद्ध राहील. समाजविघातक प्रवृत्तींना रोखण्यासाठी एकजुटीने आणि कायदेशीर मार्गाने लढा देण्याचा निर्धार यावेळी पदाधिकाऱ्यांनी केला.

मार्गदर्शन करताना बाबुराव क्षेत्रे पाटील म्हणाले, “शिरूर तालुक्यातील महिलांनी संघटित होऊन संघटनेच्या माध्यमातून आपला आवाज बुलंद करावा. महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आम्ही आवाज उठवू आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पूर्ण ताकदीने उभे राहू.” त्यांनी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी स्थानिक स्तरावर उद्योग-व्यवसाय सुरू करण्याचे आश्वासन दिले.

या कार्यक्रमामुळे शिरूर तालुक्यात भ्रष्टाचारविरोधी चळवळीला बळ मिळाले असून, नव्या पिढीतील पदाधिकाऱ्यांच्या सहभागामुळे गावपातळीवरील संघर्ष अधिक तीव्र व प्रभावी होण्याची शक्यता आहे.

विजय कांबळे, प्रतिनिधी
RJNEWS27MARATHI.COM

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें