June 15, 2025 8:41 am

“मी डॉक्टर आहे, सेल्समन नाही!” – एका डॉक्टरचा काळजाला हात घालणारा आत्मचिकित्सक जाब…

मी डॉक्टर आहे, सेल्समन नाही!” – एका डॉक्टरचा काळजाला हात घालणारा आत्मचिकित्सक जाब 

खास रिपोर्ट, RJNEWS27MARATHI.COM

मी डॉक्टर आहे… सेल्समन नाही!”

या एकाच वाक्यानेî सर्वांच्या काळजात चर्र झालं आहे. या देशात डॉक्टर म्हणजे देवमाणूस मानले जातात. पांढऱ्या कोटात दिसणारा माणूस आपल्याला दिलासा देतो, अशा माणसाकडून आपल्याला जीव वाचवण्याची आशा असते. पण जेव्हा तोच डॉक्टर एका गलिच्छ व्यवस्थेचा बळी ठरतो, तेव्हा प्रश्न उपस्थित होतो – आपण खरंच रुग्णसेवा करत आहोत की दुकान चालवत आहोत?

एक व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. एका खासगी रुग्णालयातील डॉक्टर, आपली ओळख न उघड करता, अत्यंत भावनिक आणि संतप्त स्वरात मनातलं सगळं बोलून टाकतो. त्याचे शब्द चाट लावणारे आहेत.

रोज मॅनेजमेंट मीटिंग होते. सांगितलं जातं – २० बेड भरले पाहिजेत. एकही खाट रिकामी नको. रुग्णाला गरज असो वा नसो, त्याला ऍडमिट करा. OPD मध्ये जो येईल, त्याला बेडवर टाका. सर्जरीची गरज नाही? कोण विचारतो? रुग्ण वाचेल का? कोणाला पडलंय? टार्गेट पूर्ण करा – एवढंच सांगतात…”

या शब्दांमधून जे चित्र समोर येतंय, ते केवळ भयावहच नाही, तर मानवीतेला लाजवणारं आहे. पैशाच्या हव्यासासाठी चालणाऱ्या या यंत्रणेचा बळी ठरत आहेत रुग्ण – आणि त्याहीपेक्षा अधिक, डॉक्टरांची माणूस म्हणून जपलेली ओळख.

कधी वाटतं मी डॉक्टर आहे की इन्शुरन्स सेल्समन? पेशन्ट म्हणजे संख्या आहे का? रोज मोजले जातो… पण आता नाही! मी गप्प बसणार नाही!”

हा आवाज एकट्या डॉक्टरचा नाही. हा आवाज आहे, अशा असंख्य डॉक्टरांचा, जे मनाने आजही “वैद्य” आहेत. जे रुग्णाच्या डोळ्यात पाहून व्यथा समजून घेतात. पण ज्यांना व्यवस्थेने केवळ नफा कमावणारे यंत्र बनवून टाकलं आहे.

या डॉक्टरचा प्रश्न सर्व समाजाला विचार करायला लावणारा आहे – “हे रुग्णालय आहे की दुकान?”

आज गरज आहे अशा आवाजाला बळ देण्याची. गरज आहे रुग्णसेवेच्या नावाने चालणाऱ्या व्यावसायिक दहशतीला थांबवण्याची. गरज आहे डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामधला विश्वास पुन्हा जपण्याची.

कारण शेवटी, वैद्य हा देव नाही, पण तो “देवाचं रूप” असतो – तेव्हाच, जेव्हा तो माणुसकी जपतो, आणि माणूस म्हणून वागायला व्यवस्थाही त्याला मोकळं करतं.

तुमचं मत काय? अशा व्यवस्थेविरोधात आवाजठवणाऱ्या डॉक्टरला तुम्ही पाठिंबा द्याल का?
कॉमेंट करा, शेअर करा, आणि या सिस्टीमवर प्रश्न विचारणं थांबवू नका!

(ही बातमी आपल्या वाचकांसाठी खास – RJNEWS27MARATHI.COM वर 

Leave a Comment

और पढ़ें

best news portal development company in india

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें