“मांडवगण फराटा कोळपे वस्ती ते गणपती माळ दरम्यान अपघातांचे सत्र कायम – नागरिकांची तात्काळ गतिरोधक बसविण्याची मागणी”
मांडवगण फराटा (प्रतिनिधी- औदुंबर फटाले
कोळपे वस्ती ते गणपती माळ या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले असून, या मार्गावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच पार्श्वभूमीवर कोळपे वस्तीतील ग्रामस्थांनी या मार्गावर तात्काळ गतिरोधक (स्पीड ब्रेकर) बसविण्याची जोरदार मागणी केली आहे.
या रस्त्यावर जिल्हा परिषद शाळा असून लहान मुलांची व वयोवृद्धांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते. तसेच गुऱ्हाळांची वाढती संख्या या भागात लक्षणीय आहे. अशा परिस्थितीत भरधाव वाहनांच्या माऱ्यातून रोजचा प्रवास धोकादायक बनत चालला आहे.
औदुंबर फटाले RJ NEWS MARATHI यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक अपघातांच्या घटनांमध्ये काही जण गंभीर जखमी झाले असून काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. या गंभीर परिस्थितीची दखल प्रशासनाने अद्याप घेतलेली नाही, याबाबत ग्रामस्थांत तीव्र नाराजी आहे.
साई दूध डेरी पासून गणपती माळ दरम्यान वाहनांचे वेग थोपवण्यासाठी गतिरोधक अत्यंत आवश्यक आहेत. यामुळे वाहनचालकांची बेफिकीर गाडी चालवण्याची प्रवृत्ती आळवली जाऊ शकते आणि अपघातांचे प्रमाण नक्कीच कमी होऊ शकते.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, “प्रशासन अजून किती जणांचा बळी गमावल्यावर जागे होणार आहे?” असा सवाल उपस्थित होत आहे. प्रशासनाने तात्काळ या मार्गावर स्पीड ब्रेकर बसवावेत, अन्यथा जनआंदोलनाचा इशारा देण्यात येईल, अशी नागरिकांची तीव्र भावना आहे.
– प्रतिनिधी, RJNEWS27MARATHI.COM