June 15, 2025 7:48 am

बेकायदेशीर रासायनिक खत साठा प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल – शिरूर पोलिसांची कारवाई

बेकायदेशीर रासायनिक खत साठा प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल – शिरूर पोलिसांची कारवाई

शिरूर, पुणे – तालुक्यातील न्हावरे गावाच्या हद्दीत अवैधरित्या रासायनिक खते साठवणूक करणाऱ्या दोन आरोपींविरोधात शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई 27 मे 2025 रोजी सायंकाळी करण्यात आली असून, एकूण 8 लाख 78 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी धनंजय दिनकर पाटील (वय 53 वर्षे, रा. सण ओर बीट सन सिटी रोड सिंहगड रोड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून संतोष दिनकर वेताळ आणि महेंद्र गणपत शेलार (दोघेही रा. न्हावरा, ता. शिरूर, जि. पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 मे रोजी सायंकाळी 5.30 वाजता न्हावरा ते गुनाठ रोड शेजारील गट क्रमांक 313 मध्ये कारवाई करण्यात आली. या ठिकाणी कोणताही अधिकृत परवाना नसताना अमोनियम सल्फेट आणि मॅग्नेशियम सल्फेट या रासायनिक खतांचा साठा बेकायदेशीररित्या केला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी धाड टाकली.

छाप्यामध्ये खालील प्रमाणे मुद्देमाल हस्तगत करण्यात आला:

अमोनियम सल्फेट खत: 40 किलो वजनाच्या एकूण 917 बॅगा – अंदाजे किंमत ₹8,71,150

मॅग्नेशियम सल्फेट खत: 25 किलो वजनाच्या 11 बॅगा – अंदाजे किंमत ₹7,150
एकूण जप्त मालमत्ता: ₹8,78,300

या संपूर्ण प्रकरणात आरोपींकडे खत उत्पादन व साठा करण्यासाठी कोणताही वैध परवाना नव्हता. शासनाची फसवणूक करून अवैधरित्या रासायनिक खते साठवणूक करत असल्यामुळे आरोपींविरुद्ध आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणात शिरूर पोलीस स्टेशनमध्ये 28 मे 2025 रोजी सकाळी 6.19 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. कारवाईत पोलीस हवालदार शिंदे यांनी सहभाग घेतला असून, प्रभारी अधिकारी म्हणून संदेश केंजळे कार्यरत आहेत.

शिरूर परिसरात अशा प्रकारे बेकायदेशीर खत साठवणूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांची ही कारवाई इतरांसाठी इशारा ठरणार आहे.

Leave a Comment

और पढ़ें

best news portal development company in india

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें