अतिवृष्टीने टाकळी भीमा परिसरात हाहाकार; शेतकऱ्यांच्या जिवनावर घाला
“शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्या!” – राहुलदादा करपे पाटील यांची आर्त मागणी
नागरगाव, पुणे जिल्हा प्रतिनिधी -विजय कांबळे
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी व अतिवृष्टीने पुणे जिल्ह्यातील अनेक भागांना जबर फटका बसला आहे. विशेषतः टाकळी भीमा, रांजणगाव सांडस, तळेगाव, शिक्रापूर, आलेगाव, पागा या परिसरात शेतकऱ्यांच्या जगण्याच्या आधारस्तंभावरच घाला आला आहे.
या संकटात शेतकऱ्यांची होरपळ पाहून युवा उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते राहुलदादा करपे पाटील यांनी स्वतः शेतकऱ्यांच्या गावी, बांधावर, घरांमध्ये जाऊन त्यांची विचारपूस केली. त्यावेळी अनेकांचे डोळे अश्रूंनी भरलेले होते. काहींच्या घरांमध्ये पाणी घुसले होते, काहींची घरेच कोसळली होती. शेतामध्ये उभी असलेली पिके वाहून गेली होती. कांद्याची शेती पूर्णतः उद्ध्वस्त झाली होती. मातीचे थर वाहून गेल्याने काही ठिकाणी शेती पुन्हा नांगरण्याच्या स्थितीतदेखील राहिलेली नाही. काही ठिकाणी मोठ्या झाडांचा कोसळण्याचा आणि घरांचे पत्रे उडण्याचा प्रकारही घडला आहे.
या पार्श्वभूमीवर राहुलदादा करपे पाटील यांनी प्रशासन व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने दौऱ्यावर येऊन पंचनामे करण्याची विनंती केली आहे. “शेतकऱ्यांची अवस्था अतिशय गंभीर आहे. त्यांच्या डोळ्यात फक्त आसवं आहेत, आणि मनात एकच प्रश्न — आता पुढे काय?” असं म्हणत त्यांनी प्रशासनाला सजग करत, “शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळाली पाहिजे, अन्यथा अनेक शेतकरी उध्वस्त होतील,” अशी जोरदार मागणी केली.
राहुलदादांनी यावेळी तहसीलदारांशी थेट संवाद साधून पुढील कार्यवाहीसाठी पाठपुरावा करण्याचा निर्धार केला. या आपत्तीमध्ये शासनाने केवळ पाहणी न करता, शेतकऱ्यांच्या हृदयाचा आक्रोश ओळखून तत्काळ मदतीचे पाऊल उचलले पाहिजे, असेही त्यांनी ठामपणे नमूद केले.
आज ज्या भूमीत अन्न पिकते, तीच भूमी अश्रूंनी भिजत आहे. आजचा शेतकरी हतबल आहे, पण जर शासन आणि समाजाने त्याचा हात पकडला, तर तो पुन्हा नव्याने उभा राहील – हाच विश्वास राहुलदादांनी त्यांच्या संवेदनशील पुढाकारातून दाखवून दिला आहे.
(RJNEWS27MARATHI.COM कडून व
आपणास जर आपल्या परिसरातील अशीच काही माहिती पाठवायची असेल, तर आमच्याशी संपर्क करा.