“श्रमदानात गैरहजेरीचा राग मनात ठेवून कुटुंबावर हल्ला; सरपंचासह सहा जणांवर गुन्हा दाखल!”
बीड तालुक्यातील वंजारवाडी गावात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गावात सुरू असलेल्या श्रमदान उपक्रमात सहभाग न घेतल्याच्या कारणावरून गावातील एका कुटुंबाला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आदर्श गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वंजारवाडीतच घडलेल्या या प्रकारामुळे गावकऱ्यांत आणि प्रशासनात खळबळ उडाली आहे.
गावात नुकताच झाडे लावण्याचा श्रमदान उपक्रम राबविण्यात आला होता. मात्र, या उपक्रमात विठ्ठल तांदळे यांचे कुटुंब सहभागी झाले नव्हते. याचाच राग मनात धरून गावचे सरपंच वैजनाथ तांदळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एकत्र येत विठ्ठल तांदळे यांच्या कुटुंबातील तिघांना बेदम मारहाण केली. या हल्ल्यात दोन महिलांचा समावेश असून सर्व जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात सरपंचासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. गावच्या “आदर्श” प्रतिमेला गालबोट लावणाऱ्या या घटनेमुळे सामाजिक स्तरावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
[RJNEWS27MARATHI.COM]
ताज्या बातम्यांसाठी आणि गावोगावच्या घडामोडींसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.