June 20, 2025 10:14 am

रांजणगाव गावात खळबळजनक घटना: महिलेची दोन चिमुकल्यांसह निर्घृण हत्या, मृतदेह पेटवून देण्याचा प्रयत्न…

रांजणगाव गावात खळबळजनक घटना: महिलेची दोन चिमुकल्यांसह निर्घृण हत्या, मृतदेह पेटवून देण्याचा प्रयत्न

 

रांजणगाव, ता. शिरुर, पुणे | २५ मे २०२५ — पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील रांजणगाव गावाच्या हद्दीत खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एका महिलेची तिच्या दोन बालकांसह निर्घृण हत्या करून मृतदेह पेटवून देण्याचा अमानुष प्रकार अज्ञात व्यक्तींनी केल्याचे उघड झाले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

ही घटना रांजणगाव परिसरातील खंडाळा घाटाजवळील झुडपांमध्ये समोर आली. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, सदर महिलेचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षे असून तिच्या उजव्या हातावर ‘जय भीम’ असे गोंदलेले आहे. तिच्यासोबत मृत्यूमुखी पडलेले दोन चिमुकले बालक तिचीच मुले असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. यातील एका मुलाचे वय सुमारे ४ वर्षे असून दुसरे बाळ दीड वर्षांचे आहे.

पोलिसांनी सांगितले की, मृतदेहांवर पेट्रोल टाकून ते जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, अचानक आलेल्या पावसामुळे मृतदेह अर्धवट अवस्थेत जळलेले आढळले. यामुळेच सदर घटना उजेडात आली.

 

रांजणगाव पोलिस स्टेशनचे अधिकारी, फॉरेन्सिक पथक आणि डॉग स्क्वॉड घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे. अद्याप मयतांची ओळख पटलेली नाही.

रांजणगाव पोलिस प्रशासनाने गावातील नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांच्या परिसरात कोणी भाडेकरू मिसिंग आहे का, किंवा अशा महिलेबद्दल कुणाला काही माहिती असल्यास तात्काळ रांजणगाव पोलीस स्टेशनला संपर्क साधावा, जेणेकरून या गंभीर घटनेचा तपास लवकरात लवकर उलगडू शकेल.

ही घटना कुठल्यातरी कौटुंबिक वादातून घडली की आणखी काही कारण आहे, हे तपासाअंती स्पष्ट होईल. तोपर्यंत नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अधिकृत तपास सुरु असून पुढील माहितीची प्रतीक्षा आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें