June 20, 2025 10:02 am

दोन निरागस जीवांसह आईचा अमानुष अंत! – रांजणगाव एमआयडीसीत हृदय पिळवटून टाकणारी घटना, मृतदेह जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न…

दोन निरागस जीवांसह आईचा अमानुष अंत! – रांजणगाव एमआयडीसीत हृदय पिळवटून टाकणारी घटना, मृतदेह जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

माणुसकीला काळीमा फासणारी घटना… आई आणि दोन चिमुकल्यांचे आयुष्य निर्दयपणे संपवले!

शिरूर तालुक्यातील रांजणगाव एमआयडीसी परिसरात २५ मे २०२५ रोजी सकाळी अशी एक भयावह घटना समोर आली की ज्याने संपूर्ण परिसर हादरून गेला. लक्ष्मी मंदिराच्या पाठीमागे, गट क्रमांक २१४ या निर्जन जागी आढळलेले अर्धवट जळालेले तीन मृतदेह म्हणजे नराधमतेचे क्रूर प्रतीक ठरले.

एक अंदाजे २५ ते ३० वर्षांची तरुणी आणि तिचे दोन निष्पाप लहान मुलगे – एक केवळ तीन वर्षांचा, तर दुसरा अवघ्या दोन वर्षांचा! या तिघांचा इतक्या क्रूरपणे खून करण्यात आला की पाहणाऱ्यांचे काळीज सुन्न झाले. केवळ हत्या करून समाधान न मानता, नराधमाने त्यांचे मृतदेह पेटवून पुरावेही नष्ट करण्याचा अमानुष प्रयत्न केला. हे कृत्य कोणत्याही संवेदनशील मनाला हादरवून टाकणारे आहे.

महिलेच्या उजव्या मनगटावर ‘Mom Dad’, ‘Rajratan’, ‘जय भीम’, तर पाठीमागे ‘R’ व ‘S’ अशी गोंदवलेली अक्षरे, डाव्या हातावर फुलांची डिझाईन – हे सारे तपशील तिची ओळख पटवण्यास महत्त्वाचे ठरत आहेत. मात्र, इतक्या ओळखसंपन्न गोंदवलेल्या एका आईचे आणि तिच्या दोन चिमुकल्यांचे असे निर्घृण अंत का आणि कोणी केला, हा प्रश्न प्रचंड वेदनादायक आहे.

घटनेची माहिती मिळताच रांजणगाव एमआयडीसी पोलीस, गुन्हे शाखा, डॉग स्क्वॉड, फॉरेन्सिक व फिंगरप्रिंट तज्ज्ञांनी घटनास्थळी धाव घेतली. सहाय्यक फौजदार गुलाब येळे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल झाला असून, पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, एसडीपीओ बापूराव दडस यांनीही तातडीने घटनास्थळी भेट दिली असून, आरोपीचा माग काढण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.

या अमानुषतेने संपूर्ण भागात भीतीचं आणि अस्वस्थतेचं वातावरण पसरलं आहे. या त्रिकुटाचं आयुष्य असं संपवण्यामागे कोणते कारण असू शकते? एका आईसह तिच्या दोन बाळांचे प्राण घेणारा हा राक्षसी मनोवृत्तीचा नराधम नेमका कोण? त्याच्यापर्यंत पोलीस पोहोचतील का?

या हृदयद्रावक घटनेने ‘माणुसकी जिवंत आहे का?’ असा सवाल पुन्हा एकदा समोर उभा केला आहे.

Leave a Comment

और पढ़ें

best news portal development company in india

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें