June 15, 2025 7:42 am

सामाजिक बांधिलकीचा अनोखा ठसा – विद्याधाम प्रशालेच्या २००४ च्या दहावीच्या बॅचचा स्मरणीय स्नेहमेळावा….

सामाजिक बांधिलकीचा अनोखा ठसा – विद्याधाम प्रशालेच्या २००४ च्या दहावीच्या बॅचचा स्मरणीय स्नेहमेळावा

 

शिरूर (प्रतिनिधी) :

शिरूर येथील विद्याधाम प्रशाला ही केवळ शिक्षणसंस्था नसून, शैक्षणिक आणि संस्कारक्षमतेची पाऊलवाट घडवणारी एक गौरवशाली शाळा म्हणून ओळखली जाते. याच शाळेतील २००४ सालच्या दहावीच्या बॅचने एक आगळावेगळा, सामाजिक बांधिलकी जपणारा स्नेहमेळावा १८ मे २०२५ रोजी अत्यंत उत्साही आणि भावनिक वातावरणात साजरा केला.

जुन्या आठवणींना नवा उजाळा…
सुमारे वीस वर्षांनंतर पुन्हा एकदा शाळेच्या आवारात एकत्र जमलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह, nostalgiचा झरा आणि आपुलकीची भावना स्पष्ट दिसून येत होती. “शाळेच्या पायरीवरून पुढील जीवनाचे पाऊल टाकताना जी मूल्यं शिकवली, ती आजही आमच्या आयुष्याचा मूलभूत पाया आहेत,” अशा भावना यावेळी व्यक्त झाल्या. एकमेकांच्या आठवणी जागवताना हास्य, आनंद, कधी डोळ्यांत पाणी तर कधी गळ्यात मिठी अशा अनेक क्षणांनी वातावरण भारावले.

शिक्षक-विद्यार्थी एकत्रित सन्मानसोहळा…
या स्नेहमेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे पाचवी ते दहावी पर्यंत अध्यापन करणारे सर्व शिक्षक – श्री पोटे, श्री कुलकर्णी, श्री बालटे, श्री बनकर.श्री मुळे, श्री जैन, श्री तांबोळी, श्री खेमनर, श्री जाधव, श्री देंडगे, सौ. पटेल, सौ. वाठोडकर, सौ. आवटी, श्रीमती रणदिवे – आणि काही शिक्षकेतर कर्मचारी यांचा मन:पूर्वक गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांनी दिलेल्या सन्मानामुळे शिक्षकवृंदही भारावून गेले.

सामाजिक बांधिलकीचा आदर्श…
या स्नेहमेळाव्याची खरी उठावदार गोष्ट ठरली ती म्हणजे विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा सत्कार न करता, त्यांच्या मार्गदर्शनात गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करणे. हा उपक्रम केवळ एक सामाजिक जबाबदारी नसून, आपल्या शाळेच्या मूल्यांना दिलेला सर्वोच्च मान आहे. भविष्यातही असे उपक्रम राबवण्याचा निर्धार सर्वांनी एकमुखाने व्यक्त केला.

संघटन कौशल्याची चमकदार झलक…
या कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत सुबकपणे आणि समन्वयाने पार पडले. मयूर गादिया, कुमार वर्मा, प्रतीक बिसावा, उदय सुकळे, अभिजीत थोरात या प्रमुख संयोजकांनी हेमंत काळे, यशोदीप थोरात, सोनाली लोखंडे, परीक्षित गायकवाड, भाग्यश्री वाघमारे, पीयूष हटकर, सागर बांदल यांच्या सहकार्याने नियोजन, निमंत्रण व आयोजन यशस्वीपणे पार पाडले. सूत्रसंचालन परीक्षित गायकवाड व भाग्यश्री वाघमारे यांनी तर आभार प्रदर्शन अभिजीत थोरात यांनी केलं.

भविष्यासाठी नव्या संकल्पांची नांदी…
या स्नेहमेळाव्याने केवळ जुन्या आठवणींना उजाळा दिला नाही, तर एक सामाजिक चळवळ, एक विचारधारा उभी करण्याचा पाया घातला. “मैत्री, शिक्षण आणि समाजहित” या त्रिसूत्रीवर आधारित अशी मेळावे ही समाजासाठी प्रेरणास्थान ठरणारे ठरतात.

प्रतिनिधी, Rjnews27 मराठी

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें