भरधाव टाटाची इनोव्हावर जोरदार धडक : शिरूर बायपासवर मध्यरात्रीचा थरार, कुटुंबातील दोघे जखमी
शिरूर (प्रतिनिधी) – शिरूर शहरातील बायपास परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव टाटा 1109 गाडीने मागून धडक दिल्याने इनोव्हा गाडीत बसलेल्या दोघांना गंभीर व किरकोळ दुखापती झाल्या. हा अपघात निष्काळजी व बेदरकार वाहनचालकामुळे घडल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले असून, शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अखिल सिराहीम शेख (वय २६, रा. एकनाथ नगर, केडगाव, ता. व जि. अहिल्यानगर) हे आपल्या कुटुंबासह वडिलांच्या नावे असलेल्या टोयोटा इनोव्हा (MH 16 DS 9735) गाडीतून पुणे-नगर महामार्गावरून प्रवास करत होते. २० मे २०२५ रोजी रात्री १२.०५ च्या सुमारास शिरूर बायपासवरील रिलायन्स पंपासमोरील गतीरोधक ओलांडल्यानंतर त्यांच्या गाडीला भरधाव आलेल्या टाटा 1109 (MH 04 JY 3301) या गाडीने मागून जबर धडक दिली.
ही धडक इतकी भीषण होती की, इनोव्हामधील फिर्यादीचे वडील शिराहीम मिनू शेख व आई मजदुल सिराहीम शेख या दोघांना दुखापत झाली. यामध्ये शिराहीम शेख यांना गंभीर तर मजदुल शेख यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. आरोपी वाहनचालक अजिनाथ उत्तम चव्हाण (वय २७, रा. बारापट्टा लाड, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर) याने वाहतूक नियमांचे उल्लंघन करत भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवले असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. ३४७/२०२५ अन्वये भा.दं.वि. कलम २८१, १२५ (अ), (ब), ३२४(४) व मोटर वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याची नोंद २० मे रोजी पहाटे ४.४३ वाजता करण्यात आली असून, पोलीस हवा राऊत (ब.नं. ३३००) यांनी फिर्याद नोंदवली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार साबळे करत आहेत.
– Rjnews27 मराठी