रांजणगाव गणपतीत भव्य तिरंगा रॅली; सैन्य दलाच्या सन्मानार्थ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रतिनिधी | शिरूर
भारतीय सैन्य दलाच्या शौर्याला सलाम करत रांजणगाव गणपती येथे शनिवारी भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. माजी सैनिक, युवक, महिला आणि विविध सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत देशभक्तीची झणझणीत भावना प्रकट केली.
रॅलीची सुरुवात एस.टी. स्टँडपासून झाली. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास अभिवादन करून रॅलीने हनुमान मंदिर मार्गे महागणपती मंदिर गाठले. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’, ‘अमर जवान अमर रहें’ अशा घोषणांनी रस्ता दुमदुमून गेला.
महागणपती मंदिर येथे रॅलीची सांगता झाली. यावेळी माजी सैनिकांनी आपल्या मनोगतातून सैन्यदलातील अनुभव, त्याग आणि राष्ट्रसेवेला उजाळा दिला. याच कार्यक्रमात जम्मू-काश्मीरमधील पहेलगाव येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आणि नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
रॅलीनंतर माजी सैनिकांचा विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये रामदास लांडे, मेजर महादेव खेडकर, विलास लांडे, गोरक्ष गदादे, शांतराम मांजरे, गौतम शेळके, छगन चौधरी आदींचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास भा.ज.पा. शिरूर बेट मंडळ अध्यक्ष सौ. संयोगिता पलांडे, उपाध्यक्ष ज्योती पलांडे, कविता गलांडे, स्वाती बत्ते, तसेच श्रीकृष्ण देशमुख, अजित साकोरे, सतिषदादा पाचंगे, हर्षददादा जाधव, अमोल बोऱ्हाडे, संजय फंड, सुनील शेळके, नानासाहेब लांडे, गणेश पाचुंदकर, आदिनाथ नरवडे, रुपेश भोपत, प्रथम बोरखडे, अभिदादा देवकर यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नानासाहेब लांडे यांनी केले तर आभारप्रदर्शन सतिषदादा पाचंगे यांनी केले.
या रॅलीचे आयोजन भा.ज.पा. विद्यार्थी आघाडी पुणे जिल्हाध्यक्ष हर्षददादा जाधव आणि अजित साकोरे यांनी केले.
रॅलीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना वृद्धिंगत करत भारतीय सैन्यदलाच्या कार्याला सलाम करण्यात आला.