बाभुळसर बुद्रुक येथील पद्मश्री डॉ.आप्पासाहेब पवार माध्यमिक विद्यालयाचा 100% निकाल
अल्लाउद्दीन अलवी प्रतिनिधी
17.बाभुळसर बुद्रुक येथील श्रीगोंदा तालुका ग्रामीण शिक्षण संस्थेचे डॉ. पद्मश्री आप्पासाहेब पवार माध्यमिक विद्यालय सन 2024 2025 एसएससी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.तसेच पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पूर्व असलेले पद्मश्री आप्पासाहेब पवार माध्यमिक विद्यालय हे निसर्ग रम्य सुंदर वातावरणामध्ये व तसेच सुसज्ज इमारती सहित असून महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री बबनराव दादा पाचपुते साहेब, विद्यालय संस्थापक हनुमंत भाऊ पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे विद्यालय शिस्तबद्ध असल्याचे दिसून येते. तसेच मुख्याध्यापक प्रा. जे डी पवार सर यांच्या चोख देखरेखीखाली गुणवत्तापूर्वक शिक्षक,कर्मचारीवृंद,प्रयोगशाळा व खेळासाठी क्रीडांगण यामुळे विद्यार्थ्यांचा ओघ या शाळेकडे आकर्षिला जात आहे. तसेच शाळेचे प्रथम पाच विद्यार्थी पुढीलप्रमाणे यश संपादन करताना दिसत आहे. तसेच सुरज सुनील कुदळे प्रथम क्रमांक 82.60% द्वितीय क्रमांक श्रुती अजित गवळी 77 45% तृतीय क्रमांक प्राप्ती दीपक गरुड 77 %, चतुर्थ क्रमांक साईराज अमोल नागवडे यांस 74.60% आणि पाचवा सानवी नवनाथ नागवडे 74 % अशाप्रकारे विद्यालयाचे विद्यार्थ्यांनी यश मिळवून कौतुकाची थाप संपूर्ण पंचक्रोशीमधून मिळत आहे. यावेळी स्थानिक स्कुल कमिटी सदस्य राजकुमार हांडे( माजी ग्रामपंचायत सदस्य)व प्रकाश आप्पा पाटोळे यांच्या हस्ते सुरज सुनील कुदळे यांचा सन्मान करण्यात आला ,यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये महेंद्र रणदिवे सर, संतोष नागवडे, सुनील आबा कुदळे आत्याबाई कुदळे, अल्लाउद्दीन अलवी सचिव राज्य मराठी पत्रकार परिषद शिरुर तालुका आदी उपस्थित होते. यावेळी राजकुमार हांडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की सुरजने गरीब परिस्थितीमधून शिक्षण घेत असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले, त्यातून सुरजने आई-वडिलांच्या कष्टाचे चीज केल्याचं यावेळी सांगितले.