June 15, 2025 7:51 am

डंपरची धडक! दोन निष्पापांचा मृत्यू, एकाचा जीव टांगणीला; चालक फरार

डंपरची धडक! दोन निष्पापांचा मृत्यू, एकाचा जीव टांगणीला; चालक फरार

मांडवगण फराटा (ता. शिरूर) – भरधाव आणि बेफिकीरपणे चालवलेल्या डंपरने अक्षरशः थेट मृत्यूची धडक दिल्याची गंभीर घटना मांडवगण फराटा येथे घडली आहे. 17 मे रोजी रात्री 8 च्या सुमारास झालेल्या या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, एकजण गंभीर जखमी झाला आहे. धडक देताच डंपर चालकाने घटनास्थळावरून पलायन केले. शिरूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात डंपर चालकाविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या भीषण अपघाताची फिर्याद दादा बाळासो कोळपे (वय 38, रा. कोळपेवस्ती, मांडवगण फराटा) यांनी दिली. त्यानुसार, डंपर (क्र. एम एच 42 से क्यु 7696) मांडवगण फराट्याकडून वडगाव रासाईकडे जात असताना, रोहीदास थोरात यांच्या घरासमोरच्या वळणावर रॉन्ग साईडने भरधाव वेगात येत होता. या डंपरने समोरून येणाऱ्या पीकअप वाहन (क्र. एम एच 03 ओ ई 0638) ला जबर धडक दिली.

या अपघातात पीकअपमधील सागर संभाजी कोळपे (वय 28, रा. मांडवगण फराटा) आणि यश सुधाकर भिसे (वय 12, रा. कोळपे वस्ती, मूळ रा. खेडवाडी, ता. गेवराई, जि. बीड) या दोघांचा मृत्यू झाला. तर अनिल बीरा कोळपे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

धडकेनंतर घटनास्थळावर न थांबता डंपर चालक पळून गेला. अपघाताची माहिती न देता निघून गेलेल्या या चालकाविरुद्ध शिरूर पोलिसांनी गुन्हा क्रमांक 341/2025 अन्वये भारतीय दंड विधान व मोटार वाहन कायद्यानुसार विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

या गंभीर प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक नकाते करत असून, शिरूर पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे, तर चालकाच्या अटकेची मागणी ग्रामस्थांतून जोर धरू लागली आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें