शिरूर पोलिसांची मोठी कारवाई : तीनपत्ती जुगार अड्ड्यावर छापा, सात जण ताब्यात, ८४ हजारांहून अधिक रोख रक्कम व मोबाईल जप्त
शिरूर : शिरूर शहरातील काचेआळी परिसरात बेकायदेशीर तीनपत्ती जुगार सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर शिरूर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली. अंबिका निवास नावाच्या एका खाजगी ठिकाणी सात जणांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडण्यात आले असून त्यांच्या जवळून एकूण ८४,२६० रुपयांची रोख रक्कम, मोबाईल फोन्स आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई 14 मे 2025 रोजी सायंकाळी 7.30 वाजता करण्यात आली.
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एस.एस. नरके (रांजणगाव पोलीस स्टेशन) यांनी फिर्याद दाखल केली असून आरोपींमध्ये शिरूरमधील विविध भागांतील रहिवासींचा समावेश आहे.
पकडण्यात आलेले आरोपी पुढीलप्रमाणे :
1. अनिल मधुकर तांबे (वय 40, रा. रेव्हेन्यू कॉलनी)
2. प्रदीप श्रीकृष्ण तिवारी (वय 42, रा. साईनगर)
3. किसन विठ्ठल जामदार (वय 64, रा. कुंभार आळी)
4. संजय केवलचंद भटेवरा (वय 65, रा. सुभाष चौक)
5. गणेश जयसिंग मल्लाव (वय 36, रा. काचेआळी)
6. श्रीकांत दशरथ मल्लाव (वय 34, रा. काचेआळी)
7. सुनिता मधुकर धाडीवाल (रा. काचेआळी) — जिच्या मालकीच्या ठिकाणी हा जुगार सुरु होता.
जप्त करण्यात आलेल्या वस्तूंचा तपशील असा आहे :
अनिल तांबे कडून 22,500 रुपये व सॅमसंग मोबाईल
प्रदीप तिवारी कडून 13,250 रुपये व दोन मोबाईल
किसन जामदार कडून 6,070 रुपये व ओपो मोबाईल
संजय भटेवरा कडून 23,250 रुपये व रिअल मी मोबाईल
गणेश मल्लाव कडून 7,700 रुपये व एमआय मोबाईल
श्रीकांत मल्लाव कडून 5,940 रुपये व व्हिवो मोबाईल
याशिवाय एक वापरलेला व 10 नवीन पत्यांचे कॅटही जप्त करण्यात आले.
या कारवाईमध्ये पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस नाईक भोते व पोलीस नाईक जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या संपूर्ण कारवाईचे नेतृत्व शिरूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंदळे यांनी केले.
या धडक कारवाईमुळे शहरात जुगाराच्या बेकायदेशीर धंद्यांना चाप बसणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. पोलीस प्रशासनाने मिळालेल्या माहितीच्या आधारे तत्परतेने ही कारवाई केली असून, अशा कारवाया भविष्यातही सुरू राहणार असल्याचे संकेत पोलिसांकडून देण्यात आले आहेत.