“शब्द नाही… काम बोलतंय! राहुलदादा करपे पाटील गरजूंना ठरत आहेत खऱ्या अर्थाने ‘आधारवड’!”
प्रतिनिधी – विजय कांबळे
नागरगाव – टाकळी भीमा:
राजकीय कोणताही गड नाही, ना कुठला सत्ता-संवाद! तरीही आपल्या निष्ठा, सेवाभाव आणि अपार कष्टाच्या जोरावर राहुलदादा करपे पाटील हे नाव आज गरिब, गरजू, आणि अनाथ बालकांसाठी “आधारवट” ठरत आहे.
“शब्द नाही… काम बोलतंय!” हे वाक्य आज त्यांच्या कार्यामुळे सार्थ ठरतं आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना अंतर्गत त्यांनी १०० पेक्षा अधिक मुला-मुलींना प्रत्यक्ष मार्गदर्शन करत, त्यांचे अर्ज भरून, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून, थेट २२५० रुपयांची आर्थिक मदत त्यांच्या खात्यावर जमा होईपर्यंत प्रत्येक टप्प्यावर स्वतः उपस्थित राहून संपूर्ण प्रक्रिया पार पाडली.
राहुलदादा करपे पाटील यांचे विशेष कौतुक करावे लागेल कारण ते कोणत्याही राजकीय पदावर नाहीत, ना त्यांच्याकडे कोणताही राजकीय वारसा आहे. तरीही स्वतःच्या ऑफिसमध्ये आणि ‘राहुलदादा करपे पाटील सोशल फाउंडेशन’ च्या माध्यमातून त्यांनी हा समाजोपयोगी उपक्रम उचलून धरला.
या योजनेमुळे शेकडो कुटुंबांना दिलासा मिळाला, महिलांना मानसिक आधार मिळाला आणि मुला-मुलींना शिक्षणासाठी एक नवा प्रकाश मिळाला. आर्थिक अडचणींमुळे शिक्षण थांबण्याच्या टोकावर असलेल्या मुलांचे आयुष्य पुन्हा चालू झालं, याचं संपूर्ण श्रेय या सेवाभावी कार्यकर्त्याला जातं.
राहुलदादा म्हणतात, “मुलांच्या चेहऱ्यावरचं हसू हेच माझ्यासाठी लाखमोलाचं बक्षीस आहे.”
त्यांचे कार्य पारदर्शक, निस्वार्थ आणि सकारात्मकतेचा सर्वोच्च आदर्श आहे. आजच्या काळात अशी उदाहरणं विरळा आहेत, पण समाजासाठी काही तरी देणं लागतो ही भावना मनाशी बाळगून राहुलदादा सतत झटत आहेत.
आज समाजाला अशाच खऱ्या कर्मवीरांची गरज आहे!