बाभुळसर बुद्रुक येथे महिला नेतृत्वाची चमक — कविता पाटोळे बिनविरोध निवडल्या
प्रतिनिधी – अल्लाउद्दीन अलवी | ता. ९, बाभुळसर बुद्रुक (ता. शिरूर, जि. पुणे)
बाभुळसर बुद्रुक येथील संत तुकाराम विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या सर्वसाधारण कर्जदार मतदारसंघातून संचालकपदाच्या एका जागेसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत सौ. कविता हनुमंत पाटोळे यांची एकमेव उमेदवार म्हणून नामनिर्देशन आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवड महिला नेतृत्वाला चालना देणारी आणि समाजात सकारात्मक संदेश देणारी ठरली आहे.
ही निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी दीपक वराळ यांच्या मार्गदर्शनाखाली तर संस्थेचे चेअरमन मनोहर मचाले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. नियोजित वेळेनुसार विषयपत्रिकेप्रमाणे अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असता, संचालकपदासाठी फक्त सौ. कविता हनुमंत पाटोळे यांचा अर्ज प्राप्त झाला. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा दीपक वराळ यांनी केली. सचिव विजय सोपान नागवडे यांनी निवडणूक सहअधिकारी म्हणून जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली.
या निवडीनंतर संस्थेच्या प्रांगणात एक छोटा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, ज्यामध्ये अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. यामध्ये परिक्रमा शैक्षणिक संकुल काष्टीचे उपाध्यक्ष हनुमंत भाऊ पाटोळे, माजी चेअरमन सुनील दादा नागवडे, भाजपा किसान मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष सचिन बापू मचाले, विद्यमान संचालिका मंगल नागवडे, रुक्मिणी बँकेचे संचालक महेश नागवडे, माजी संचालक रामदास नागवडे, संचालक अंबादास पाटोळे, माजी चेअरमन राजेंद्र नागवडे, अमोल नागवडे (स्थानीय शाळा समितीचे उपाध्यक्ष), संतोष काका नागवडे (श्री दत्त ग्रामीण पतसंस्थेचे उपाध्यक्ष), अल्लाउद्दीन अलवी (माजी व्हा. चेअरमन/संचालक), महेंद्र रणदिवे सर, हनुमंत देशवंत सर आदींचा समावेश होता.
नवीन संचालिका सौ. कविता पाटोळे यांना उपस्थित मान्यवरांकडून शुभेच्छा व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. महिलांनी सहकार क्षेत्रात पुढाकार घेण्याचे हे एक सकारात्मक उदाहरण असून स्थानिक पातळीवर त्यांच्या निवडीचे स्वागत करण्यात येत आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे सचिव विजय नागवडे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.