खाजगी शाळांना टक्कर देणारी जिल्हा परिषद शाळा – मांडवगण फराटा शाळेला डिजिटल ओळख, ग्रामस्थांचा स्तुत्य उपक्रम!
जिल्हा परिषद शाळेत ग्रामस्थांच्या वतीने डिजिटल नाव सप्रेम भेट – एक नवा आदर्श!
प्रतिनिधी: विजय कांबळे | स्थळ: मांडवगण फराटा
मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने आपल्या प्रगतीच्या वाटचालीत एक नवा अध्याय जोडला आहे. ग्रामस्थांच्या पुढाकारातून या शाळेला डिजिटल नाव देण्यात आले असून, या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. शिक्षणाच्या गुणवत्तेच्या बाबतीत खाजगी शाळांना जोरदार टक्कर देणारी ही शाळा आज अनेकांच्या प्रेरणास्थानी ठरत आहे.
शाळेच्या बदललेल्या रूपाने ग्रामस्थ आणि पालक वर्ग भारावून गेला आहे. सुसज्ज वर्गखोल्या, मुले-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, प्रशस्त ग्राउंड, तज्ज्ञ शिक्षकवृंद आणि सतत सक्रिय शाळा व्यवस्थापन समिती यांमुळे शाळेचे रूपांतर एका गुणवत्तापूर्ण शैक्षणिक केंद्रात झाले आहे.
शाळेला डिजिटल ओळख मिळवून देण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीने गावातील दानशूर व्यक्तींना विश्वासात घेतले. या कल्पनेला भरभरून प्रतिसाद देत खालील मान्यवरांनी आपले योगदान दिले:
श्री. पंडित दादा फराटे.श्री. खंडेराव अण्णा फराटे पाटील.श्री. संभाजी आप्पा फराटे इनामदार.श्री. सागर नाना फराटे (ग्रामपंचायत सदस्य).श्री. नितीन फराटे पाटील.श्री. राहुल दाजी गवळी.श्री. प्रवीण आप्पा जगताप. श्री शेखर नाना मचाले.श्री. शेखर नाना मचाले.श्री. भैय्या फराटे.कु. मयूर शेठ बोरा
या दानशूर व्यक्तींनी दिलेल्या सप्रेम भेटीतून शाळेला डिजिटल नाव प्राप्त झाले असून, हे नाव केवळ शाळेची ओळख नव्हे, तर तिच्या सर्वांगीण विकासाचे प्रतीक बनले आहे.
शाळेच्या विविध उपक्रमांत विद्यार्थ्यांचा उल्लेखनीय सहभाग आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे जिल्हा परिषद शाळा मांडवगण फराटा आता खाजगी शाळांना तोडीस तोड स्पर्धा देत आहे. याबाबत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश भैय्या फराटे यांनी सांगितले की, “आपल्या जिल्हा परिषद शाळेचा नावलौकिक हा येणाऱ्या भविष्यकाळामध्ये जिल्हाभर नाहीतर महाराष्ट्रभर गाजणार आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश या शाळेत घालावा व शाळेच्या प्रगतीत भागीदार व्हावे.”
“आपल्या जिल्हा परिषद शाळेचा नावलौकिक हा येणाऱ्या भविष्यकाळामध्ये जिल्हाभर नाहीतर महाराष्ट्रभर गाजणार आहे तरी पालकांनी जास्तीत जास्त पाल्यांचा जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश घ्यावा” – अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती योगेश भैय्या फराटे