शिरूरमध्ये जागेच्या वादातून कुटुंबावर हल्ला; चौघांविरोधात गुन्हा दाखल
शिरूर (प्रतिनिधी) – शिरूर तालुक्यातील गोलेगाव रोड परिसरात जागेच्या वादातून एका कुटुंबावर लाकडी काठ्यांनी व हाताने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी श्रद्धा भगत भोसले (वय २२, रा. गोलेगाव रोड, स्टेट बँक कॉलनी, शिरूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. ५ मे २०२५ रोजी रात्री ९.३० ते १० दरम्यान त्यांच्या राहत्या घरासमोरील जागेच्या कारणावरून आरोपी दीपक बबन गुंजाळ, विश्वास बबन गुंजाळ, सोहम झरेकर व एक अनोळखी इसम यांनी फिर्यादीसह त्यांचे आई-वडील, भाऊ व चुलत मामा यांना लाकडी काठ्यांनी आणि हाताने मारहाण केली. तसेच शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११८(१), ११५(२), ३५१(२)(३), ३५२ व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याची नोंद दि. ८ मे २०२५ रोजी रात्री ८:४६ वाजता करण्यात आली.
या प्रकरणाचा तपास सहाय्यक फौजदार साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असून, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्याकडे या प्रकरणाची जबाबदारी आहे.