झाडाखाली जुगार अड्डा! रांजणगाव पोलिसांची धडक कारवाई
सात जण अटकेत, १२.५४ लाखांचा मुद्देमाल जप्त – बाभूळसर खुर्द परिसरात गुन्हेगारी टोळी सक्रिय?
बाभूळसर खुर्द (ता. शिरूर) –
शिरूर तालुक्यातील बाभूळसर खुर्द गावच्या हद्दीतील एका शेतातील झाडाखाली सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत सात जणांना अटक करण्यात आली असून १२ लाख ५४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्हा मुंबई जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) अंतर्गत दाखल करण्यात आला आहे.
जुगारी अड्ड्यावरून जप्त मुद्देमाल
रोख रक्कम : ₹२४,८००
मोबाईल फोन्स
वाहने (दुचाकी/चारचाकी)
जुगार साहित्य
एकूण किंमत – ₹१२,५४,८००
आरोपींची नावे व पत्ते:
1. बाळू कृष्णाची बत्ते (रा. रांजणगाव)
2. नवनाथ सूर्यकांत थीटे (रा. न्हावरे)
3. संतोष बाजीराव वाळके (रा. करडे)
4. अमोल मारुती गायकवाड (रा. करडे)
5. नाना विक्रम पवार (रा. भांबर्डे)
6. शशी वाळके (रा. बाभूळसर खुर्द)
7. गोकुळ गव्हाणे (रा. न्हावरे)
पोलिसी कारवाईत सहभागी अधिकारी
सहायक पोलीस निरीक्षक अशोक चव्हाण
सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे
पो.ह. विलास आंबेकर, संतोष आवटी, रामेश्वर आव्हाड, उमेश कुतवळ
झाडाखाली गुपचूप सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई; सात जण अटकेत आणि लाखोंचा मुद्देमाल जप्त.
जनतेसाठी इशारा!
अवैध जुगार, मटका, सट्टा यांसारख्या गुन्हेगारी कारवायांबद्दल माहिती मिळाल्यास तत्काळ पोलिसांना कळवा,” असे आवाहन रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी केले आहे.