June 20, 2025 10:34 am

फॉर्च्यूनरचा थेट गाळ्यात शिरकाव! पुणे-नगर महामार्गावरील सरदवाडीत विचित्र अपघात, सुदैवाने जीवितहानी नाही

फॉर्च्यूनरचा थेट गाळ्यात शिरकाव! पुणे-नगर महामार्गावरील सरदवाडीत विचित्र अपघात, सुदैवाने जीवितहानी नाही

सविस्तर बातमी:
पुणे-नगर महामार्गावर अपघाताचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. याच मार्गावरील सरदवाडी (ता. शिरूर) येथे आज रविवार (दि. ४ मे) पहाटे सुमारास एक धक्कादायक आणि विचित्र अपघात घडला. पुण्याकडून नगरच्या दिशेने जाणारी टोयाटो कंपनीची फॉर्च्यूनर (क्र. एमएच १२ टीके ८२३२) ही आलिशान चारचाकी गाडी चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे थेट महामार्गालगत असलेल्या गाळ्यात घुसली.

सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र गाळ्याचे मोठे नुकसान झाले आहे. सदर गाळा आशिष सरोदे यांचा असून, गाडीने शटर फोडून भिंतीला जोरदार धडक दिल्याने शटर व भिंतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अपघात होताच सरोदे यांनी त्वरित डायल ११२ वर संपर्क साधून शिरूर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, प्राथमिक तपासात अपघातग्रस्त फॉर्च्यूनर कार वाघोली (ता. हवेली) येथील असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, या मार्गावर काही दिवसांपूर्वीच एक कंटेनरही नियंत्रण सुटून गाळ्यात शिरल्याची घटना घडली होती. त्यामुळे महामार्गालगत असलेल्या व्यवसायिकांनी आता सुरक्षिततेबाबत अधिक दक्षता घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

शिरूर पोलीस या अपघाताच्या अधिक तपासात व्यस्त असून, वाहनचालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडला की तांत्रिक बिघाडामुळे, याचा शोध घेतला जात आहे.

नवीन अपडेटसाठी वाचा – RJ News 27 मराठी

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें